Mumbai Crime News: साकीनाका परिसरात विवाहितेची आत्महत्या, हुंड्याच्या तगाद्यामुळे संपवलं आयुष्य, घरच्यांचा आरोप

Shocking News : साकीनाका येथे एका विवाहितेनं आत्महत्या केलीय. हुंड्यामुळे तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On

मुंबईमधील साकीनाका परिसरात एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. गळफास घेऊन विवाहितेनं आयुष्य संपवलंय. सासरच्यांकडून हुंड्याचा तगादा लावला जात होता, असा आरोप मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी केलाय. याप्रकरणी साकीनाका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला. साकीनाका पोलीस याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार ममता प्रेमशंकर कुशवाह वय २३ असं विवाहितेचं नाव आहे. ममता ही मूळची उत्तर प्रदेशातील अकबरशाहपूर येथील राहणारी होती. घटनेच्या दिवशी ममता आणि तिच्या सासूमध्ये वाद झाला होता. तसेच तिच्या पत्नीने तिला मारहाण केली होती. ममताचा हा दुसरा विवाह होता. ममताचं पहिलं लग्न २०२२ मध्ये झाला होता. मात्र तेथे तिला सासरवास होत होता. कौटुंबिक वाद आणि ममताचा पहिला पती तिला शारीरिक त्रास देत होता.

त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर २०२४ मध्ये तिच्या घरच्यांनी तिचा दुसरा विवाह लावून दिला होता. तिच्या दुसऱ्या पतीचं नाव राजेश जोखई प्रसाद मोर्य (वय ३२) असं होतं. राजेश हा चालक होता. तो देखील उत्तर प्रदेशमधील रहिवाशी होता. उत्तर प्रदेशातील छतोना येथील तो रहिवाशी होता. राजेश देखील ममताचा हुंड्यासाठी मानसीक आणि शारीरिक छळ करत होता. त्याचे घरचे ममताकडे माहेरून पैशांची मागणी कर होते. त्यातून त्यांच्या वाद होत होते.

Mumbai Crime News
Wardha Crime : सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका, ऐनवेळी गर्लफ्रेंडचा लग्नास नकार; बॉयफ्रेंडचा तरुणीवर चाकूहल्ला

घरासाठी पैशांचा तगादा

मुलीचं जीवन आनंदी आणि सूखमय हवं यासाठी ममताच्या घरच्यांनी तिचा दुसरा विवाह लागून दिला होता. लग्नाच्या वेळीस तिच्या घरच्यांनी संसार उपयोगी साहित्य, पाच तोळे सोने, ममताचा नवरा राजेशसाठी दोन तोळे सोन्याची साखळी, अंगठी ममताच्या माहेरच्यांनी करून दिली होती. त्याचबरोबर साडेचार लाख रोख रक्कम हुंडा म्हणून दिली होती. लग्नानंतर ममता तिच्या सासरच्या मूळ गावी राहिली होती. त्यानंतर ममताच्या पतीने एक प्लॅट खरेदी केला. हा प्लॅटसाठी ममताच्या पतीने तिच्या माहेरच्यांकडून पाच लाख रुपये उसने घेतले.

पण ते पैसे तिच्या पतीने कधीच परत केले नाही. त्यानंतर ममतासोबत तिचे सासू शांतीदेवी जोखई प्रसाद मोर्या ह्या राहू लागल्या. सुरुवातीला त्या ममतासोबत चांगल्या वागत होत्या. पण काही दिवसांनी त्या ममतासोबत वाद घालत असायच्या. त्यानंतर ममता कधी माहेरच्यांना फोन करायची तेव्हा ती त्यांच्याकडे नेहमी पैशांची मागणी करायची.

काही दिवस पैसे दिल्यानंतर ममताच्या वडिलांनी पैसे मागण्याचं कारण विचारलं. तेव्हा ममतानं सांगितलं की, तिचे पती राजेशने प्लॅट हा ममताच्या नावाने घेतला होता. त्यामुळे घराचे हप्ते भरण्यासाठी तो ममताच्या घरच्यांकडून पैसे मागत असायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com