मुंबई कोस्टल रोडच्या टनेलमध्ये भीषण अपघात; भर पावसात कार उलटली, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Mumbai Coastal Road Accident: मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडसंबंधित अनेक व्हिडिओ आणि बातम्या आपण दरदिवशी पाहत असतो. सध्या याच कोस्टल रोड एक भयंकर अपघात झालेला आहे. नेमके काय घडले ते व्हिडिओत पाहा.
mumbai coastal road accident
Saam Tv
Published On

मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडवरील टनेलमध्ये शुक्रवारी एक धक्कादायक अपघात घडला. मुसळधार पावसामुळे रस्ता ओलसर झाल्याने एक कार घसरून थेट टनेलच्या मध्यभागी उलटली. सुदैवाने गाडीतील चालकाने सीट बेल्ट लावलेला असल्याने मोठा अनर्थ टळला.

हा अपघात(Accident) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेनंतर टनेलच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आणि काही वेळातच मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, त्यामुळे रस्त्यांवर गुळगुळीत पणा जाणवत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार वेगात होती आणि पावसामुळे टनेलमध्ये पाण्यामुळे रस्ते गुळगुळीत झाले आहेत. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या कठड्यावर आदळली आणि उलटून पडली. यावेळी गाडीतील दोन्ही एअरबॅग्स उघडले गेले, त्यामुळे चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. स्थानिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली आणि अपघातग्रस्त व्यक्तीला गाडीतून बाहेर काढले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक वाहतूक पोलीस(Police) आणि आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्वप्रथम वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कारला बाजूला करण्यात आले आणि काही वेळात वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "चालकाचे प्राण वाचले याचे समाधान आहे. सीट बेल्ट आणि एअरबॅग्समुळे मोठा अनर्थ टळला आहे."

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

mumbai coastal road accident
Shocking Accident: पंढरपुरात भीषण अपघात! भरधाव रिक्षाची दुचाकीस्वाराला धडक; सीसीटीव्ही फुटेज समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com