Mumbai News: मुंबईत पावसाचा चौथा बळी, चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai Tree Collapsed: मुंबईमध्ये झाड कोसळून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. धावत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली. गोरेगावच्या आरो कॉलनीमध्ये ही घटना घडली.
Mumbai News: मुंबईत पावसाचा चौथा बळी, चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai Tree CollapsedSaam Tv
Published On
  • आरे कॉलनीत चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली

  • अपघातामध्ये १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • हसन रझा सय्यद असं तरुणाचे नाव होते

  • दुचाक

  • मुसळधार पावसामुळे मुंबईतील झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

संजय गडदे, मुंबई

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडत आहेत. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत. मुंबईत पावसाने चौथा बळी घेतला आहे. अंगावर झाडाची फांदी कोसळून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरे कॉलनीत चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी मुसळधार पावसादरम्यान आरे कॉलनीतील युनिट क्रमांक १३ रस्त्यावर ही दुर्घटना घडली. मृत तरुणाची ओळख हसन रझा जहांगीर आलम सय्यद (१८ वर्षे) अशी पटली आहे. हसन रझा हा साकीनाका परिसरातील रहिवासी होता. मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना झाडाची मोठी फांदी त्याच्या डोक्यावर कोसळली.

Mumbai News: मुंबईत पावसाचा चौथा बळी, चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai News : मुंबईत धुरकं! दृश्यमानतेत घट, वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम?

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या हसन रझाला उपचारासाठी तात्काळ मलाड पूर्व येथील बाळाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आरे कॉलनी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेपूर्वी कुर्ल्यामध्ये अंगावर झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Mumbai News: मुंबईत पावसाचा चौथा बळी, चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai News: मॅनहोलमध्ये 'तो' माणूस कसा पडला? १० सेकंदाचा थरारक सीसीटीव्ही VIDEO आला समोर

कुर्ल्यातील नौपाडा येथे आज दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास झाड कोसळले. या घटनेत ६३ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. युनूस कुंडावाला असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव होते. या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले असून त्यांनी कारवाईची मागणी केली.

Mumbai News: मुंबईत पावसाचा चौथा बळी, चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, रेल्वे उशिराने; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

दोन दिवसांपूर्वी साकिनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. रस्त्यावरून चालत असताना अचानक उघड्या मॅनहोलमध्ये ही व्यक्ती पडली. या घटनेत ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. त्याआधी चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. या चार वेगवेगळ्या घटनांनंतर संतप्त नागरिकांनी मुंबई महानगर पालिकेच्या महापौरांना धारेवर धरलं.

Mumbai News: मुंबईत पावसाचा चौथा बळी, चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक बंद, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com