Police Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका! 10 बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे लागली वर्णी?

Navi Mumbai 10 Police Transfer Update News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत.
NAVI MUMBAI POLICE TRANSFERS: 10 SENIOR INSPECTORS GET NEW POSTINGS IN MAJOR ADMINISTRATIVE RESHUFFLE
NAVI MUMBAI POLICE TRANSFERS: 10 SENIOR INSPECTORS GET NEW POSTINGS IN MAJOR ADMINISTRATIVE RESHUFFLESaam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईतील १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्या जाहीर

  • सानपाडा, खारघर, उरण, न्हावाशेवा, कामोठे आणि पनवेलसह अनेक ठाण्यांमध्ये फेरबदल

  • अधिकाऱ्यांना तातडीने नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे महत्त्वपूर्ण आदेश सोमवारी (२९ जून) जारी करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न (२) अंतर्गत जनहित आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालय स्तरावरील मान्यतेनंतर एकूण १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आदेशानुसार सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी देविदास प्रभाकर कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक विजय सुर्वे यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आनंदा वाघमारे यांची एनआरआय पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली राहुल पाटील यांची उरण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

NAVI MUMBAI POLICE TRANSFERS: 10 SENIOR INSPECTORS GET NEW POSTINGS IN MAJOR ADMINISTRATIVE RESHUFFLE
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

सायबर विमानतळ पोलीस ठाण्यात तात्पुरते संलग्न असलेले पोलीस निरीक्षक सुरज ज्ञानदेव पाटील यांची खारघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे यांच्याकडे न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती बाळासाहेब देशमुख यांची कामोठे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

NAVI MUMBAI POLICE TRANSFERS: 10 SENIOR INSPECTORS GET NEW POSTINGS IN MAJOR ADMINISTRATIVE RESHUFFLE
Gold Rate Today : महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा १८००० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा रघुनाथ कुंभार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुर्भे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन शंकर कदम यांची गुन्हे शाखेच्या एएचटीयू विभागात बदली करण्यात आली असून गुन्हे शाखेतील चेतनाराज चौधरी यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जारी केलेल्या आदेशात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने हजर राहून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com