Housing Society : मराठी सभासदाचे नाव मतदार यादीतून वगळण्याचे प्रकरण; सोसायटीच्या चार सदस्यांना पाच वर्षांची बंदी

Mumbai Borivali News : मुंबईतील बोरिवलीच्या सनराईस व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत मराठी सभासद डॉ. अनिकेत जोशी यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याच्या कथित प्रयत्नावर उपनिबंधकांची कारवाई. चार सदस्यांवर कारवाई.
Mumbai Housing Society
Mumbai Housing Society AI Imge
Published On: 
Summary
  • मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील सनराईस व्ह्यू सोसायटीत निवडणुकीवरून वाद

  • मराठी सभासद डॉ. अनिकेत जोशी यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याची मागणी केली

  • चौघांना पुढील पाच वर्षे व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवता येणार नाही

संजय गडदे, मुंबई

मुंबईत मराठी सभासदाला सोसायटीच्या निवडणुकीत मतदान करता येऊ नये, यासाठी त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण आता चांगलेच महागात पडले आहे. बोरिवली पश्चिम येथील सनराईस व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील या प्रकरणात उपनिबंधक कार्यालयाने चार सदस्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. या चौघांना पुढील ५ वर्षे सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवता येणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान डॉ. अनिकेत जोशी या मराठी सभासदाचे नाव मतदार यादीतून काढून टाकावे, अशी मागणी सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती. डॉ. जोशी यांना अद्याप शेअर होल्डर प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही, असे कारण यासाठी पुढे करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला.

Mumbai Housing Society
Death News : आई पहाटे ४:३० वाजता उठवायला गेली पण...' लोकप्रिय अभिनेत्याचा झोपेतच मृत्यू,सिनेसृष्टीवर शोककळा

या घटनेमुळे सोसायटीमध्ये मराठी आणि गुजराती सभासदांमधील वादाला तोंड फुटले होते. मराठी सभासद नंदकिशोर राऊत यांना डॉ. जोशी यांचे मत मिळू नये, या हेतूनेच त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही झाला. डॉ. जोशी यांनी या निर्णयाविरोधात आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाची दखल घेत उपनिबंधक, सहकारी संस्था, आर. नॉर्थ विभागाने चौकशीअंती चार सदस्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला. यामध्ये किरीट ध्रुव, मॉरिस रॉड्रिक्झ, सुनील शाह आणि अंकित शेठ यांचा समावेश आहे. या चौघांना आता पुढील पाच वर्षे सोसायटीचे पदाधिकारी किंवा व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून निवडून येता येणार नाही.

Mumbai Housing Society
Weather Update : पावसाचा जोर वाढणार! १४ जिल्ह्यांना अलर्ट, ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे हवामान बदललं

दरम्यान, या सोसायटीतील कथित गैरव्यवहाराबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाने सोसायटीवर प्रशासक नेमला होता. या कारवाईमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच कोणत्याही सभासदाचा मतदानाचा अधिकार मनमानी पद्धतीने हिरावून घेता येणार नाही, हा मुद्दाही या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.