Death News : आई पहाटे ४:३० वाजता उठवायला गेली पण...' लोकप्रिय अभिनेत्याचा झोपेतच मृत्यू,सिनेसृष्टीवर शोककळा

Actor Anuj Thakur Passes Away News : 'बंधन साथ जनमों का' आणि 'धूम मचाओ धूम' फेम अभिनेता अनुज ठाकूर यांचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन झाले. झोपेत हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याची माहिती मित्र रूपेश सोनार यांनी दिली.
Actor Anuj Thakur News
Actor Anuj Thakur News AI Image
Published On: 
Summary
  • प्रसिद्ध अभिनेता अनुज ठाकूर यांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन

  • 'बंधन साथ जनमों का' आणि 'धूम मचाओ धूम' या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची ओळख मिळवली

  • झोपेत हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती

  • अनुज यांच्या अचानक निधनाने मित्रपरिवार आणि मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता अनुज ठाकूर यांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. 'बंधन साथ जनमों का' आणि 'धूम मचाओ धूम' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनुज यांच्या निधनाची माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रूपेश सोनार यांनी दिली. रूपेश आणि अनुज यांची ओळख २००८ मध्ये 'बंधन सात जन्मों का' या मालिकेच्या सेटवर झाली होती. गेल्या १८ वर्षांपासून त्यांची मैत्री होती. रूपेश अनुज यांना आपल्या लहान भावाप्रमाणे मानत होते. रूपेश यांनी सांगितले की, अनुजच्या मृत्यूच्या अवघ्या दहा दिवस आधी भेट झाली होती. त्यावेळी अनुज खूप आनंदी होता. पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करण्याची त्याची इच्छा होती. तो आपल्या करिअरमध्ये नव्याने सुरुवात करण्याचा विचार करत होता. मात्र, त्याचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.

Actor Anuj Thakur News
Weather Update : पावसाचा जोर वाढणार! १४ जिल्ह्यांना अलर्ट, ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे हवामान बदललं

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका मित्राचा फोन आला. त्याने अनुजच्या निधनाची बातमी दिली. सुरुवातीला रूपेश यांना या बातमीवर विश्वासच बसला नाही. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट झाली होती. अनुज रात्री झोपायला गेला आणि त्यानंतर पुन्हा उठलाच नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. यानंतर रूपेश यांनी अनुजच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. शनिवारी ते त्यांच्या घरी गेले असता त्यांना अनुजला झोपेत असताना हार्ट अटॅक आला आणि त्याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.

Actor Anuj Thakur News
Green Tea Benefits : वजन कमी करण्यापासून ते आजारांशी दोन हात करेपर्यंत...; 'हे' 2 पदार्थ मिसळून ग्रीन टी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे

अनुज रोज पहाटे साडेचार वाजता उठत होता. त्याचा रोजचा ठरलेला दिनक्रम होता. मात्र, त्या दिवशी अलार्म वाजूनही तो उठला नाही. त्याची आई त्यांला उठवण्यासाठी खोलीत गेली, पण अनुजकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रूपेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अनुज यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अनुज नेहमी हसतमुख असायचा. प्रत्येकाशी प्रेमाने बोलायचा आणि गरजूंना मदत करायचा. त्याच्यासारखा चांगला मित्र आणि माणूस गमावल्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.