Weather Update : पावसाचा जोर वाढणार! १४ जिल्ह्यांना अलर्ट, ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे हवामान बदललं

Maharashtra Weather Update Today News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मुरासू चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather News
Maharashtra Weather News AI Image
Published On: 
Summary
  • बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.

  • चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे.

  • महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत असलेले हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही दिसून येत आहे. आज राज्यातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदरी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather News
FASTag Update : FASTag च्या नियमात मोठा बदल! वार्षिक पाससाठी मोजावे लागणार इतके पैसे; वाचा

याशिवाय रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर या मध्य महाराष्ट्र व कोकणातील भागांमध्येही काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळू शकतात.

Maharashtra Weather News
Mumbai : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! तरुणाने गुपचूप महिलांचे व्हिडिओ काढले अन्...

राज्यातील उर्वरित भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ढगाळ वातावरण असले तरी काही ठिकाणी उन्हाचा तडाखा कायम राहू शकतो. तापमानात चढ-उतार होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुरासू वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन दिवाळीच्या तोंडावर पाऊस धुमाकूळ घालण्याची चिन्ह दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.