Mumbai : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! तरुणाने गुपचूप महिलांचे व्हिडिओ काढले अन्...

Mumbai Local Train News : मुंबई लोकलमध्ये तरुणाने चर्चगेट ते विरारदरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढून AI द्वारे मॉर्फ करून अश्लील रील्स बनवल्या. आरोपी साबीर मोहम्मद रुस्तमला अटक.

मुंबईची लोकल ट्रेन ही लाखो प्रवाशांसाठी रोजच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, याच लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे गुपचूप फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांचा गैरवापर करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांचे आरोपीकडून चोरून व्हिडिओ काढले जात होते. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून या व्हिडिओंमध्ये बदल केले जात होते. महिलांचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून त्यातून अश्लील रील्स तयार केल्या जात असल्याचा आरोप आहे. या रील्स इंस्टाग्रामवर पोस्ट करून जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी साबीर मोहम्मद रुस्तम याला अटक केली आहे. तसेच त्याचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडिओ आढळल्याची माहिती आहे. या घटनेमुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.