मुंबईकरांचा जीव टांगणीला! AC लोकलचा कुलिंग सिस्टीम फेल; गुदमरल्याने ३ प्रवासी अत्यवस्थ, १ रुग्णालयात दाखल

Mumbai Local Train News : मुलुंड रेल्वे स्थानकावर एसी लोकलची कुलिंग सिस्टीम अचानक बंद पडल्याने डब्यात गुदमरून तीन प्रवाशांची प्रकृती बिघडली. एका प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रेल्वे प्रशासनाच्या देखभालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
mumbai AC local
mumbai AC local
Published On

मुंबईतील लोकल रेल्वेचा प्रवास सध्या प्रवाशांसाठी त्रासाचा आणि तितकाच धोकादायक ठरू लागला आहे. मुलुंड रेल्वे स्थानकावर टिटवाळाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका एसी लोकलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बिघाडामुळे लोकलमधील एसी (एअर कंडिशनर) तब्बल १५ मिनिटांहून अधिक काळ बंद पडल्याने डब्यात प्रचंड गुदमरून तीन प्रवाशांची प्रकृती बिघडली. यातील एका पुरुष प्रवाशाची तब्येत जास्त बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळाहून मुंबई सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एसी लोकल मुलुंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली असता, गाडीतील एसी यंत्रणा अचानक ठप्प झाली. आधीच गर्दी आणि त्यातच बंद डब्यांमधील एसी बंद झाल्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तब्बल १५ मिनिटे ही कुलिंग सिस्टीम पूर्णपणे बंद होती. पॅक बंद डब्यांमध्ये हवा खेळती न राहिल्याने डब्यातील प्रवाशांचा जीव गुदमरू लागला.

mumbai AC local
मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

३ प्रवासी अत्यवस्थ, १ रुग्णालयात भरती

या गुदमरणाऱ्या वातावरणामुळे लोकलमधील तीन प्रवाशांची प्रकृती अचानक खालावली. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुष प्रवाशाचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत प्रवाशांना मदतीचा हात दिला. दोन्ही महिला प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच तातडीने प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय मदत देण्यात आली. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

पण एका पुरुष प्रवाशाला गुदमरल्यामुळे अत्यंत तीव्र त्रास जाणवू लागला. त्यांची खालावलेली प्रकृती पाहता, त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

mumbai AC local
Deputy Collector : २ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई; महसूल विभागात मोठी खळबळ

प्रवाशांमधून तीव्र संताप

एसी लोकलचे तिकीट आणि पाससाठी प्रवासी सामान्य लोकलपेक्षा कित्येक पटीने जास्त पैसे मोजतात. असे असतानाही रेल्वेच्या खराब देखभालीमुळे थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याने मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भर गर्दीच्या वेळी अशा प्रकारे एसी यंत्रणा निकामी झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासन या तांत्रिक बिघाडाबाबत काय स्पष्टीकरण देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

mumbai AC local
Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com