मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Chandrashekhar Bawankule Latest News : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा केला. एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV Marathi
Published On

Will Chandrashekhar Bawankule become Maharashtra CM : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यात आता खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य करत भर घातली आहे. देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याची सूत्रे येतील, असे माझे आकलन असल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्याचे हित पाहणाऱ्या, योग्य दिशेने नेणाऱ्या आणि राज्याचा स्वाभिमान टिकवणाऱ्या व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत

एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असे संजय राऊत म्हणाले. तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी मुख्यमंत्री या पदासाठी इतर कोणाचे नाव घेईन. परंतु, सध्या मला जे राजकीय चित्र दिसत आहे, त्यानुसार विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे हेच देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात योग्य नेते आहेत. बावनकुळे हे सर्वांशी उत्तम संवाद ठेवणारे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे (सांभाळून घेणारे) नेते आहेत, असे राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis
Highway Blocked: भाजपनं माजी गृहमंत्र्यांचं तिकिट कापलं, हजारो कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांवर तुफान दगडफेक; सगळा हायवे ब्लॉक

महाजन यांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब

देवेंद्र फडणवीस जर केंद्राच्या राजकारणात गेले, तर मुख्यमंत्रीपदासाठी १०० टक्के चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नावाचा विचार केला जाईल. इतकेच नाही तर स्वतः फडणवीस हेच बावनकुळेंच्या नावाची शिफारस करतील, असे माझे स्पष्ट राजकीय आकलन असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या शर्यतीत गिरीश महाजन यांच्या नावाबाबत बोलताना त्यांनी, "गिरीश महाजन यांचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत खराब आहे," असे म्हणत त्यांना बाद केले.

Devendra Fadnavis
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत 'कॅग'चा मोठा खुलासा; तब्बल ३,५०० कोटींचा जादा खर्च, सरकार अडचणीत?

सिद्धिविनायक मंदिराच्या निधीवरून सत्ताधाऱ्यांवर आरोप

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात आदेश बांदेकर अध्यक्ष असताना सिद्धिविनायक मंदिराच्या निधीचा सामाजिक कार्यासाठी अत्यंत उत्तम वापर झाला. सत्ता बदलल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या डायलिसिस केंद्राचा निधी नव्या अध्यक्षांनी रद्द केला आणि "आमच्या पक्षात प्रवेश केलास तरच निधी मंजूर केला जाईल" अशी अट घातल्याचा आरोप त्यांनी केला.

अयोध्या राम मंदिर लुटीच्या प्रकरणात देशात असंतोष आहे, मुख्य आरोपी अजूनही पकडले गेलेले नाहीत. या लुटमारीच्या विरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या 'रामरक्षा आंदोलनाचा' दुसरा टप्पा १८ जुलै रोजी साडेचार वाजता नागपूर येथे होणार आहे. या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विदर्भातील रामप्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Devendra Fadnavis
Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com