Deputy Collector : २ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई; महसूल विभागात मोठी खळबळ

Ratnagiri Deputy Collector : रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाची मोठी प्रशासकीय कारवाई. एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून दुसऱ्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश.
Ratnagiri deputy collector
Ratnagiri deputy collectorSaam TV Marathi
Published On

अमोल कलेय|रत्नागिरी प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Ratnagiri deputy collector suspension news : शासकीय कामकाजातील कथित अनियमितता आणि निष्काळजीपणा रत्नागिरीतील दोन बड्या महिला अधिकाऱ्यांच्या अंगलट आला आहे. महसूल व वन विभागाने एकाच दिवशी दोन स्वतंत्र आदेश जारी करत येथील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांवरील या एकाच वेळच्या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या धडक कारवाईत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निशा कांबळे यांना शासकीय सेवेतून थेट निलंबित करण्यात आले असून, निलंबन काळात त्यांचे मुख्यालय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयच राहणार आहे. तर दुसऱ्या कारवाईत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्याविरुद्ध गंभीर अनियमिततेप्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Ratnagiri deputy collector
Highway Blocked: भाजपनं माजी गृहमंत्र्यांचं तिकिट कापलं, हजारो कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांवर तुफान दगडफेक; सगळा हायवे ब्लॉक

प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून शासनाने रत्नागिरीतील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. या संदर्भातील पत्र नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

Ratnagiri deputy collector
Breaking: मराठवाडा पुन्हा भूकंपाने हादरला; किती रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद? नागरिक भयभीत, घराबाहेर धाव

उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती हर्षलता गेडाम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती निशाताई कांबळे अशी त्या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे आहेत. कार्यालयात विनापरवाना वारंवार गैरहजर राहणे, परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे, रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे आणि वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना करणे अशा तक्रारीवरून श्रीमती हर्षलता गेडाम यांच्यावर शासनाने कारवाई केल्याचे पत्रात नमूद केले आहे.

Ratnagiri deputy collector
Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com