विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी
sex trafficking, prostitution racket : पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान दोन बांगलादेशी नागरिकांसह एकूण सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बनावट ग्राहक पाठवून रचला सापळा
गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका नामांकित हॉटेलमध्ये अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सुरुवातीला एक 'बनावट ग्राहक' (डिकॉय कस्टमर) हॉटेलमध्ये पाठवला. तिथे व्यवहार निश्चित होताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने 'हॉटेल राहुल पार्क फॅमिली रेस्टॉरंट गार्डन बार अँड लॉजिंग-बोर्डिंग'वर अचानक छापा टाकला.
व्यवस्थापक आणि कॅशिअरसह तिघे गजाआड; मालक फरार
या धडक कारवाईत पोलिसांनी लॉजचा व्यवस्थापक गामा नंदू सोनकर, कॅशिअर दीपू उमेश यादव आणि वेटर प्रियांशु रविदास यादव या तिघांना रंगेहात अटक केली आहे. मात्र, या लॉजचा मालक रमेश शर्मा हा पोलिसांचा छापा पडताच फरार झाला असून, पोलीस सध्या त्याचा वेगाने शोध घेत आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपींविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यासह (PITA) इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का? आणि सुटका करण्यात आलेल्या बांगलादेशी महिला भारतात कशा आल्या? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.