Avinash Jadhav : ...तर महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा, मराठी-हिंदी वादावरुन अविनाश जाधव यांचं स्पष्ट मत

MNS Avinash Jadhav : तुम्ही जर तिथे राहून मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढत असाल, तर आम्ही हे करणार. आमचा विरोध त्याला असणार. आज त्यांनी काढलाय, उद्या उत्तर भारतीय काढतील, परवा आणखी कुणी तरी काढेल.
Avinash Jadhav
Avinash JadhavSaam Tv News
Published On

मुंबई : मीराभाईंदर येथील एका अमराठी मिठाई दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. काल मनसे आणि शिवसेनेच्या तसेच काही मराठी बांधवांनी तिथे मोर्चा काढला. यात दीड ते दोन हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले अविवाश जाधव यांनी 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या साम टिव्हीच्या विशेष कार्यक्रमात मुलाखत देत आपली भूमिका मांडली आहे. 'महाराष्ट्रामध्ये हिंदी चलता हैं, आम्ही मराठी बोलणार नाहीत, असं म्हणत असाल तर आम्ही असंच उत्तर देऊ', असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

'मीराभाईंदर हे महाराष्ट्रात आहे हे विसरू नका. तुम्ही जर तिथे राहून मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढत असाल, तर आम्ही हे करणार. आमचा विरोध त्याला असणार. आज त्यांनी काढलाय, उद्या उत्तर भारतीय काढतील, परवा आणखी कुणी तरी काढेल. महाराष्ट्रात एका व्यापाराच्या वादातून जर मोर्चे निघत असतील तर ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा होती'.

Avinash Jadhav
Tukdebandi Kayda : आता १ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

'महाराष्ट्रात मराठी-हिंदी हे प्रमाण भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून वाढलं. मोदींचं सरकार आलं आणि आम्ही महाराष्ट्रत मराठी बोलणार नाही, असं सुरु झालं. यामुळे मराठी माणसांमध्ये याबाबत चिड निर्माण झाली', असं जाधव म्हणाले. २०१४ मध्ये मनसेनेच भाजपला पाठींबा दिला होता, असा सवाल केला असता, अविनाश जाधव म्हणाले की, 'आम्हाला काय माहिती या सर्व गोष्टी करण्यासाठी ते येत आहेत. आमच्या घरात राहून आम्हालाच चोरी होणार आहे, हे आम्हाला आता कळायला लागलं. हे आम्हालाच महाराष्ट्रातून संपवायला निघाले. आमच्या कंपन्या गेल्या, आमच्या नोकऱ्या गेल्या आणि आमचे पोर्ट गेले', असंही अविनाश जाधव यांनी यावेळी बोलून दाखवलं.

'महाराष्ट्रातली इंटर्नल कनेक्टीव्हिटी ही उत्तम व्हायला लागली. पण आमची कनेक्टीव्हिटी गुजरातकडे वाढायला लागली. आज गुजरात-वडोदरा हायवे झाला. बुलेट ट्रेन आली. तिथे एका रस्त्याला तीन वेगवेगळे हायवे झाले. गुजरातडून मुंबईच्या दिशेने यायला निघाले तर, पालघरमध्ये तीन वेगवेगळे हायवे दिसतात आणि त्यात बुलेट ट्रेन येतेय. आम्हाला आता कळलं की यांच्या डोक्यात काय आहे', असंही अविनाश जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Avinash Jadhav
Eknath Shinde : 'रागाच्या भरात मारहाण केली, पण...'; संजय गायकवाड राड्यावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com