Eknath Shinde : 'रागाच्या भरात मारहाण केली, पण...'; संजय गायकवाड राड्यावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
eknath shinde News update
eknath shinde News Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील जेवणामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे. शिळे जेवण दिल्यामुळे गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियार व्हायरल होत आहे. संजय गायकवाड यांच्या कृत्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या मारहाणीचं समर्थन केलेलं नाही. तर आता एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं कृत्य योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनीही त्यांची कृती योग्य नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार निवासातील कॅन्टीनमधील निकृष्ट दर्जाचे जेवण त्यामुळे आमदारांनाच नाही, तर सामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो. ते जेवण खाल्ल्यामुळे त्यांना उलटी झाली. संजय गायकवाड यांनी रागाच्या भरात मारहाण केली. पण आपल्याकडे कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. कोणालाही मारहाण करणे योग्य नाही. मी संजय गायकवाड यांना समज दिली आहे'.

eknath shinde News update
No Overtime : ओव्हरटाईम टाळा, आरोग्य सांभाळा; आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट सिस्टिम

'शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा इतर प्रश्नांवर बोलण्यासाठी अधिवेशनात संधी असते. मात्र विरोधक पायऱ्यांवर बसून कॅमेऱ्यावर बोलण्यात महत्त्व देतात, असे ते म्हणाले.

eknath shinde News update
Mira Bhayandar protest : मिरा-भाईंदरमध्ये शिंदेंच्या मंत्र्याविरोधात जनआक्रोश; आंदोलकांनी प्रताप सरनाईकांना मोर्चातून हुसकावलं, VIDEO

'मराठी सक्ती करण्याचं काम सरकारने केलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम देखील आमच्या सरकारने केले. आमच्या सरकारने मराठी भाषेसाठी काय केले, मराठी माणसाला माहीत आहे. मागील अनेक वर्ष ते सत्तेत आहेत, मग मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला, असा सवाल एकनाथ शिंदे केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com