No Overtime : ओव्हरटाईम टाळा, आरोग्य सांभाळा; आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट सिस्टिम

No Overtime work : पैसे जास्त मिळण्यासाठी अनेक जण ओव्हरटाईम करतात. काही कंपन्याही कर्मचाऱ्यांवर अतिरीक्त काम करण्याचा दबाव टाकतात. मात्र एका कंपनीने कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम करु नये यासाठी खास सिस्टिम तयार केली आहे. पाहूया कोणती कंपनी आहे आणि या निर्णयाचे काय फायदे आहेत ? या खास रिपोर्टमधून...
Company Innovation
No OvertimeSaam tv
Published On

भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचे आवाहन इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केले होते. त्यावरुन सर्वंच स्तरावर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्याच कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवसातून 9 तास आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास इशारा देण्याचं धोरण आखलंय. यासाठी इन्फोसिसने एक स्वयंचलित प्रणाली तयार केली आहे. पाहूया ही ती कशी काम करते.

प्लीज नो ओव्हरटाईम

- प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाच्या तासांचं निरीक्षण

- घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सूचना

- 9 तास 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास ऑटोमॅटिक अलर्ट

- एचआर विभागाकडून कामाबाबत तपशीलवार मेल

- नियमित विश्रांती, प्राधान्यक्रम निश्चित करण्याची सूचना

- दिवसा ब्रेक घ्यायला विसरू नका

- कामाचा ताण वाटत असेल तर मॅनेजरशी बोला

- ऑफिस वेळेनंतर मेसेज आणि कॉल्सपासून दूर राहण्याचा सल्ला

- आरोग्यासाठी आणि व्यावसायिक यशासाठी संतुलित जीवन महत्त्वाचं

Company Innovation
Accident : महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अनियमित खाण्याच्या सवयी, कमी झोप आणि ताणतणाव यामुळे तरुण व्यावसायिकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. इन्फोसिसचे सध्याचे नेतृत्व आता आरोग्य आणि संतुलनाला प्राधान्य देत आहे, जे भारतीय आयटी उद्योगातील बदलत्या मानसिकतेचे प्रतिक आहे. हे धोरण केवळ एका कंपनीचा अंतर्गत निर्णय नाही तर संपूर्ण आयटी क्षेत्रासाठी एक उदाहरण आहे.

Company Innovation
Bharat Bandh : मोठी बातमी! कोट्यवधी कामगारांकडून बुधवारी भारत बंदची हाक; शाळा, बँका, पोस्ट ऑफिस... काय बंद राहणार?

जेनपॅक्ट, टीसीएस सारख्या कंपन्या आता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत आणि ताणतणावाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे बनवत आहेत. "कामाचे प्रमाण" नव्हे तर "कामाची गुणवत्ता" आणि "कर्मचाऱ्यांचे आरोग्य" हे आधुनिक भारताचे प्राधान्यक्रम बनत आहेत. ही निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com