Bharat Bandh : मोठी बातमी! कोट्यवधी कामगारांकडून बुधवारी भारत बंदची हाक; शाळा, बँका, पोस्ट ऑफिस... काय बंद राहणार?

Bharat bandh update : भारतातील ट्रेड युनियनने भारत बंदची हाक दिलीये. या बंदमुळे देशाील महत्वाच्या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे.
bharat bandh News
bharat bandh Saam tv
Published On

नवी दिल्ली : भारतातील बँक, पोस्ट ऑफिस, वाहतूक सारख्या सरकारी क्षेत्रातील २५ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी बुधवारी भारत बंदची हाक दिली आहे. भारतातील ट्रेड युनियनमधील कर्मचाऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे. देशातील १० राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियनने एकत्रितरित्या 'कामगारविरोधी, शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणाच्या विरोधात बंदचं हत्यार उपसलं आहे.

'भारत बंद'मुळे बँकिग क्षेत्र, जीवन विमा, पोस्ट ऑफिस सेवा, कोळसा खाणकाम, परिवहन आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासहित इतर प्रमुख क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे. हिंद मजदूर सभाचे हरभजन सिंह सिद्धू यांनी सांगितलं की, 'बँकिग, पोस्ट ऑफिस, खाणकाम, कारखाने आणि राज्य परिवहन सेवांवर परिणाम होणार आहे'.

bharat bandh News
Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

या 'भारत बंद'मध्ये AITUC, CITU, HMS, INTUC, SEWA आणि इतर युनियन सहभागी होणार आहेत. 'एटक'चे अमरजीत कौर यांनी सांगितलं की, '२५ कोटींहून अधिक कामगार भारत बंदमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच या भारत बंदमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील मजूर देखील सामील होण्याची शक्यता आहे'.

भारतातील २५ कोटींहून अधिक कर्मचारी १० राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियनने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत. सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी ट्रेड युनियनने बंद पुकारला आहे. या भारत बंदमुळे भारतातील प्रमुख क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

bharat bandh News
Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

कोणत्या क्षेत्रावर परिणाम होणार?

-बँक आणि विमा सेवा (Banking and insurance services)

-पोस्टल सेवा (Postal services)

- खाणकाम आणि कारखाने (Coal mining and factories)

- परिवहन सेवा (Transport System)

-शैक्षणिक संस्था ( Schoo and college)

या व्यतिरिक्त रेल्वे, मार्केट आणि दुकान आणि आपात्कालीन सेवा यांवरही भारत बंदचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु बुधवारी आपात्कालीन सेवा आणि आरोग्य सेवा सुरु राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com