Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

Nishikant dubey on Marathi People : मराठी लोकांना पटक पटकके मारेंगे, असं म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी अस्मितेवर हल्ला केलाय...त्यावरुन राज्यात वादळ उठलंय...निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचा कुणी कसा समाचार घेतलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Nishikant dubey News
Nishikant dubeySaam tv
Published On

मराठी द्वेषाचं विषारी फुत्कार काढून निशिकांत दुबे नागासारखा फणा काढून महाराष्ट्राला डिवचत उभायं. निशिकांत दुबेंनी मराठीविरोधात आगपाखड करताना केवळ ठाकरेंनाच आव्हान दिलेलं नाही तर महाराष्ट्रातील 13 कोटी मराठी माणसाच्याअस्तित्वालाच डिवचंलय.

हिंदीसक्ती विरोधात महाराष्ट्रातला मराठी माणूस पेटून उठला. आणि पोटशूळ उठलेल्या अनेक परप्रांतीयांना हा मुद्दा चांगलाच बोचला. म्हणून मराठी वरून झालेल्या एकीनंतर पायाखालची जमीन सरकलेल्या भाजपच्या निशीकांत दुबे या खासदाराने लक्ष हटवण्यासाठी आता उर्दू भाषेचा मुद्दा पुढे आणून या एकीला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केलाय.

हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वत:च ठरवा. महाराष्ट्रातील मायबोली मराठीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठी जनांची आणि महाराष्ट्रातील मात्तबर नेत्यांची तुलना याच भाजपच्या खासदारानं थेट दहशतवाद्यांशी केलीये.

Nishikant dubey News
Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट, राज ठाकरेंची मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्याच आणि काश्मीरमध्ये हिंदूंना पळवणारे सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिम यांच्या काय फरक आहे? एकाने हिंदू असूनही अत्याचार केला आणि दुसऱ्यानं हिंदीमुळे अत्याचार केला.

भाजपचा खासदार असलेल्या या निशिकांत दुबेनं मराठी प्रेमींची तुलना दहशतवाद्यांशी करुन महाराष्ट्राच्या राष्ट्रप्रेमावर सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे या दुबेवर विरोधकांनी काय आसूड ओढले पाहुया.

Nishikant dubey News
Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

हिमालयाच्या मदतीला कायम सह्याद्री धावलाय. मात्र महाराष्ट्रानं जेव्हा जेव्हा मायबोली मराठीचा जागर केला तेव्हा तेव्हा मराठी भाषिकांना कायम डिवचलं गेलंय. देशाचे प्रत्येक हल्ले मराठी माणसांनं आपल्या छाताडावर झेलले. ७ राज्यांना मागे टाकेल इतका टॅक्स एकटं मुंबई शहर केंद्राला देत आलंय.े दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राबद्दल गरळ ओकणाऱ्या आणि मराठी माणसाला आपटून आपटून मारण्याची स्वप्न पाहणाऱ्या या दुबेसारख्यांवर काय कारवाई होते यावर 13 कोटी मराठ्यांची करडी नजरये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com