
Mira Bhaindar Marathi Morcha Latest News Update : मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहे. आमच्या लोकांना उचलून का नेता? आम्ही दहशतवादी आहे का? असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. आमच्या नादाला लागायचे नाही, मराठीच्या विरोधात जो जाईल, त्याला मराठी माणूस पुरून उरेल, असा इशाराही यावेळी अविनाश जाधव यांनी दिलाय.
गुजराती लोकांना मोर्चा काढून दिला, पण मराठी माणसाला मोर्चा काढून दिला नाही. याचं नेमकं कारण काय? मराठी माणूस म्हणून एकत्र राहायचे आहे. आम्हाला मराठीमध्ये वाद करायचे नाहीत. आंदोलकांना पकडले नसते, तर आणखी मोर्चा मोठा निघाला असता. मोर्चा ५० हजारांचा झाला असता, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.
अविनाश जाधव यांना आज पहाटे पोलिसांनी घरातून ताब्यात घेण्यात आले होते. अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. लोकांचा विरोध अन् रोष पाहता अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडले. त्यानंतर ते मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले. आम्हाला ताब्यात घेतले नसते, तर मोर्चा आणखी मोठा निघाला असता. मोर्चावेळी अनेकांना ताब्यात घेतले, पोलिसांवर कुणाचा दबाव होता? असा सवाल अविनाश जाधव यांनी व्यकत केला.
आम्हाला सकाळी दहा वाजता मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली असती तर ११ वाजेपर्यंत मोर्चा संपला असता. पण पोलिसांनी मध्यरात्री ज्या प्रकारे जबरदस्ती केली, ती चुकीची आहे. पहाटे तीन वाजता माझ्या घरी आले, माझ्या कुटुंबाला उठवलं. मला मीरा भाईंदर येथे घेऊन आले. तिथून डायरेक्ट मला पालघरला नेलं. त्यांच्या मनात नेमकी भिती कसली होती? मला गोपनीय खात्यात लपवलं, अतिशय वाईट आहे, असे संतप्त सवाल जाधवांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.