कल्याणमध्ये देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मारक होणार; वास्तूजवळ कोणकोणत्या सुविधा असणार?

kalyan anandi bai joshi statue : कल्याण शहरात देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मारक होणार आहे. या वास्तजवळ महिलांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असणार आहे.
kalyan news update
kalyan news Saam tv
Published On

कल्याणात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचा भव्य भूमीपूजन सोहळा

महिला सक्षमीकरणासाठी स्मारक महत्त्वाचे केंद्र ठरणार, भविष्यासाठी मोठा उपक्रम

फक्त स्मारक नाही तर महिलांसाठी जिम, प्रशिक्षण केंद्र, ऑडीटोरियमसह अनेक सुविधा देखील उपलब्ध होणार

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा पार पडलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय महिला समन्वयाच्या संरक्षिका गीता गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नांतून साकार होणाऱ्या या स्मारकात महिलांसाठी जिम, प्रशिक्षण केंद्र आणि ऑडीटोरियमसारख्या आधुनिक सुविधा उभारल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे स्मारक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

kalyan news update
कल्याणमध्ये लाचखोरीचा प्रकार उघड; महापालिकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई

कल्याण शहरात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याने ऐतिहासिक क्षण अनुभवलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय महिला समन्वयाच्या संरक्षिका गीता गुंडे यांनी कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थिती दर्शवली होती.

देशातील पहिले स्मारक ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी भाजपाचे माजी आमदार तसेच भटके विमुक्त मोर्चाचे नरेंद्र पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळालंय. स्मारकाच्या माध्यमातून महिलांसाठी अत्याधुनिक जिम, विविध कौशल्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑडीटोरियम, महिला सक्षमीकरणासाठी इतर सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.

kalyan news update
Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श

गीता गुंडे यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्याकाळात एका महिलेने परदेशात जाऊन शिक्षण घेणे आणि डॉक्टर होणे ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असल्याचे सांगितलं. डॉक्टरकी केवळ व्यवसाय नसून समाजसेवेची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांमध्ये रुग्णांविषयी संवेदनशीलता असणे गरजेचे आहे. तसेच भावना निर्माण झाली तर पालिकेच्या रुग्णालयांमध्येही दर्जेदार सेवा मिळू शकते, असेही त्यांनी म्हटलं. महिला वर्गाच्या विकास आणि सक्षमीकरणासाठी हे स्मारक भविष्यात महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com