Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कासव तस्करीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून मुख्य सूत्रधार फरार आहे.
Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श
Chandrapur NewsSaam Tv
Published On
Summary
  • चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेचे रॅकेट उघड

  • महिलांचे शोषण आणि गुप्तधनाचे आमिष

  • कासव तस्करीतून प्रकरण समोर

  • सहा आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

संजय तुमराम, चंद्रपूर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे शोषण केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

जिवंत कासवांची तस्करी पकडली

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात मागील आठवड्यात कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिल रोजी तीन दुचाकींवरून दोन जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक केली. गंगाधर बुरांडे, मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हेमचंद शेंडे, धवल वेलादी आणि राजेंद्र दिवसे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींचे मोबाईल तपासले असता वनअधिकाऱ्यांना जबर धक्का बसला.

Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श
Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार, अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

आरोपींच्या मोबाईलमध्ये किळसवाणे व्हिडिओ

या मोबाईलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग आढळले. स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ चित्रीकरण, घुबड आणि कासवांचे फोटो, तसेच अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही हाती लागले आहेत. काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही आरोपींनी ठेवली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श
Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक

या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील चिमूर, पोंभुर्णा आणि चामोर्शी अशा ग्रामीण भागांत पसरलेले आहे. या रॅकेटमध्ये जवळपास ५० मध्यस्थ कार्यरत असून ते ‘शिकार’ शोधण्याचे काम करत होते. हे मध्यस्थ महिलांच्या जन्मकुंडल्या आणि त्यांचे व्हिडिओ मुख्य मांत्रिकाकडे पाठवितात. या वर्तुळात मांत्रिकाला ‘टेस्टर’ म्हटले जात होते. एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी ‘योग्य’ आहे की नाही, हे हा टेस्टर ठरवत असे. त्यानंतर निर्जन स्थळी किंवा स्मशानभूमीत अघोरी विधी पार पाडले जात होते. पैशाचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही स्तरांतील लोकांना फसवले जात होते.

Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श
Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

पूजेच्या निमित्ताने महिलांचे शोषण

आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता; मात्र वनविभागाच्या छाप्यादरम्यान ती बिस्किटे बनावट असल्याचे उघड झाले. सध्या सर्व सहा आरोपी वनकोठडीत असून, मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक आणि महाराज अद्याप फरार आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने लवकरच हा तपास पोलिस विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. घुबड आणि कासव यांचा संबंध आपल्या पुराणांमध्ये धनसंपत्तीशी जोडला जातो. त्यामुळे अघोरी पूजेत त्यांचा वापर केला जातो. विधवा महिला आणि कुमारिका या मांत्रिकांचे सहज सावज ठरतात. त्यांच्या पाठीशी कुणी नसल्याने त्यांचे शोषणही पूजेच्या निमित्ताने केले जाते, अशी माहिती अंनिसचे कार्यकर्ते हरीभाऊ पाथोडे यांनी दिली.

Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श
Shocking : भयंकर! ५०० हून अधिक तरुणींचे खासगी व्हिडिओ अन् फोटो; व्हायरल करण्याची धमकी देऊन कोट्यवधींना लुटलं

या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या या विळख्यात अजून किती महिला अडकल्या आहेत, याची धक्कादायक माहिती तपासाअंती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मांत्रिकापर्यंत पोहचणाचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान या प्रकरणात गुरुवारी आणखी दहा जणांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com