Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

Karnataka Political Leader Murder News : कर्नाटकातील धारवाडमध्ये काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं
Karnataka Political Leader Murder NewsSaam Tv
Published On
Summary
  • कर्नाटकमध्ये काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या

  • झोपेत असताना ४ हल्लेखोरांचा हल्ला

  • घटना सीसीटीव्हीत कैद

  • जुन्या वादातून हत्येचा संशय

  • आरोपी फरार; पोलीस तपास सुरू

Karnataka Congress Leader Feroze Pathan Murder Case कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. धारवाड शहरातील एका काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव फिरोज पठाण असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस या हत्येचा पुढील तपास करत आहेत, तसेच आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी रात्री घडली. फिरोज पठाण हे हाश्मीनगर भागात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. काल रात्री ४ अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरी घुसले. याचदरम्यान गाढ झोपेत असलेल्या फिरोज पठाण यांच्यावर या हल्लेखोरांनी भीषण हल्ला केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं
Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

ही संपूर्ण घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही हत्या जुन्या वादातून घडली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांचं संपूर्ण पथक आरोपींचा मागोवा घेत आहेत. याप्रकरणी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलीस अधिकारी म्हणाले. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com