Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

Pratap Sirnaik on Auto and Taxi Drivers: मराठी न बोलणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू असा थेट इशारा दिला.
Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा
Pratap Sarnaik Saam Tv
Published On
  • महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य

  • मुजोरी आणि आरेरावी केल्यास आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू

  • मंत्री प्रताप सरनाईकांनी दिला थेट इशारा

  • मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कायदेशीर कारवाई होणार

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणं अनिर्वाय करण्यात आले आहे. त्यांना मराठी शिकणं सक्तीचं करण्यात आले आहे. या नियमांची अंमलबजावणी २० ऑगस्टपासून करण्यात आली आहे. मराठी न बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. याच मुद्द्यावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट विथ निलेश खरे' या कार्यक्रमात संवाद साधताना रिक्षा-ट्रक्सी चालकांना थेट इशारा दिला. 'मुजोरी- आरेरावी कराल तर महाराष्ट्रात चालणार नाही. आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू.' असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना रिक्षा-ट्रक्सी चालकांशी मराठीतूनच संवाद साधा असे देखील आवाहन केले.

मराठी भाषा सक्तीबाबत इतकी वर्षे कायदा झाला तर अंमलबजावणी करण्यास वेळ का लागला? यावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, 'हा कायदा १९८९ चा कायदा आहे. या कायद्यामध्ये मराठी भाषा ही अनिर्वाय करण्यात आली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बॅच देताना त्यामध्ये तरतूद आहे की प्रवाशांशी संवाद साधताना तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. रिक्षा-टॅक्सी चालक हे फक्त उत्तर प्रदेशचे नाहीत. तर जम्मू काश्मीरपासून केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेश या देशातील बहुतांश राज्यातील लोकं रोजगारानिमित्त महाराष्ट्रात आलेत. मुंबईत ते काम करत आहेत. फक्त एका राज्यातील ती लोकं नाही आहेत. उत्तर प्रदेशातील आमच्या हिंदी भाषिकांचा यामध्ये जास्त समावेश आहे.'

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती! उद्यापासून कडक अंमलबजावणी; मराठी न आल्यास परवाना कायमचा होणार रद्द

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय कसा घेण्यात आला यावर बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, 'माझ्याकडे काही तक्रारी आल्या. आपल्या महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील, आदिवासीपाड्यातील जे मराठी प्रवासी रिक्षा आणि ट्रक्सीमध्ये बसायचे. त्यांना हिंदी काय मुंबई आणि पुण्यातील मराठी नीट येत नाही. कारण आपल्याकडे जिल्हानिहाय भाषा बदलत जाते. त्यांचा हिंदीचा काय संबंध नसायचा. त्यांना आपली मराठी बरोबर येत नाही तर ते हिंदीमध्ये काय संवाद साधतील. त्यामुळे वाद विवाद झाले. त्यावर पोलिस ठाण्यात तक्रार झाल्या. माझ्याकडे सामाजिक संघटना, आमदारांच्या अनेक तक्रारी आल्या आणि हे खूप वाढत चालल्याचे सांगितले. दिवसेंदिवस या गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मराठीत संवाद कुणी साधत नसेल तर आपण कायदेशीर कारवाई करायला हवी असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली.'

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा
Mumbai : मुंबईकरांचा प्रवास महागणार! रिक्षा आणि टॅक्सी भाडे वाढणार; किती असणार दर? जाणून घ्या

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी कसं शिकवलं याबाबत देखील प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'काही सामाजित संघटना, काही राजकीय पक्षांचे नेते, काही अमराठी नेते त्यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यांनी तीन महिन्यांची मुदत मागितली आणि मी १ मे ते १५ ऑगस्ट अशी साडेतीन महिन्यांची मुदत दिली. मराठी शिकवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ या साहित्यिकांना आमंत्रित केले. त्यांनी आनंद व्यक्त केला त्यांनी १६० वर्ग उपलब्ध करून दिले. १८०० शिक्षक या राज्यात ३६ जिल्ह्यात जाऊन तैनात केले. शहरी भागात जास्त शिक्षक दिले. आनंदाची गोष्ट ही की, १ मे रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेले अभियान हे जवळजवळ १ लाख ६५ हजार ६०० हिंदी भाषिकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि ते मराठी शिकले.'

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा
Auto Rickshaw Drivers : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महत्वाची बातमी, मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत वाढ नाही, १८ ऑगस्टपासून कारवाई

मराठी माणसंच आमच्याशी मराठीत संवाद साधत नाहीत अशी खंत रिक्षा-टॅक्सी चालकांनी प्रताप सरनाईक यांच्यासमोर व्यक्त केली होती. याबाबत सांगताना त्यांनी सर्व प्रवाशांना मराठीत बोला असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, '१ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना आम्ही जेव्हा मराठी शिकवली त्यातील बहुतांश लोकांनी आम्हाला विनंती केली की, साहेब तुम्हाला आम्हाला मराठी शिका हे सांगण्याची गरज पडली नसती जर तुमच्या मराठी प्रवाशींनी आमच्याशी मराठीत संवाद केला असता. ते मराठीत बोलले असते तर आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या मुलांसोबत देखील मराठीत संवाद केला असता' प्रताप सरनाईकांनी सर्व प्रवाशांना विनंती केली की, 'जे प्रवासी रिक्षा-टॅक्सीमध्ये बसताना त्यांनी ही मानसिकता सोडावी की समोरचा रिक्षा-टॅक्सी चालक मराठी नाही. तुम्ही मराठीत संवाद साधला तर ते आपोआपच मराठी शिकतील. त्यामुळे तुम्ही मराठीमध्येच संवाद साधा.'

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा
E rickshaw : ई-रिक्षा मोबाइलद्वारे बंद पाडल्याचा दावा; सरकारची कठोर कारवाई; 3 अॅप तात्काळ प्ले स्टोरमधून हटवले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com