Marathi Language Dispute : मराठीत बोल सांगणाऱ्या तरुणाला कान धरून हिंदीत माफी मागायला लावली; मुंब्र्यातील धक्कादायक घटना,VIDEO

Mumbra Marathi Language Dispute : मराठी तरुणाला हिंदीत माफी मागायला लावल्याची घटना घडली आहे. मुंब्रा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 मराठीत बोल सांगणाऱ्या तरुणाला कान धरून हिंदीत माफी मागायला लावली; मुंब्र्यातील धक्कादायक घटना,VIDEO
Mumbra Marathi Language Dispute Saam tv
Published On

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे : कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना मुंब्रा येथे परप्रांतीय फळविक्रेत्यांनी मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याची घटना घडली आहे. मराठीत बोल असे सांगितल्याने परप्रांतीय फळविक्रेता भडकला. या परप्रांतीय फळविक्रेत्यांने तरुणाला कान धरून माफी मागायला लावल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

 मराठीत बोल सांगणाऱ्या तरुणाला कान धरून हिंदीत माफी मागायला लावली; मुंब्र्यातील धक्कादायक घटना,VIDEO
Big Boss Marathi 5: 'गुलिगत' सूरजची बिग बॉसच्या घरात झाली फजिती, सोशल मीडियावर Video Viral

महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुला मराठीत बोलावेच लागेल, असा आग्रह या तरुणाने धरला. पण त्याची शिक्षा म्हणून त्याला चक्क हिंदी भाषेतून माफी मागायला भाग पाडण्यात आले. सर्वात कहर म्हणजे मुंब्रा पोलिसांनी मराठी तरुणाची बाजू न घेता परप्रांतीय फळविक्रेत्यांच्या तक्रारीवरून त्याच्यावरच अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. नाव विशाल गवळी असे मराठी तरुणाचे नाव आहे. मराठीवरील अन्याय आणखी किती दिवस सहन करणार, असा सवाल विचारण्यात येत आहे.

 मराठीत बोल सांगणाऱ्या तरुणाला कान धरून हिंदीत माफी मागायला लावली; मुंब्र्यातील धक्कादायक घटना,VIDEO
Viral Video: अर्रर्र! रील्ससाठी गायीचा आशीर्वाद घ्यायला गेली अन् फजिती झाली, नेमकं काय झालं पाहा व्हिडीओ

परप्रांतीय फळविक्रेता शोएब कुरेशी याचे साथीदार तातडीने जमा झाले आणि मराठमोळया विशालला अक्षरश: घेरले. तसेच त्याला दमबाजी केली आणि धारेवर धरले. काही जणांनी तर विशाल याला शिवीगाळ देखील केली. अखेर त्याला फळविक्रेत्यांनी कानाला धरून हिंदीत माफी मागायला भाग पाडले. ही बाचाबाची समजताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 मराठीत बोल सांगणाऱ्या तरुणाला कान धरून हिंदीत माफी मागायला लावली; मुंब्र्यातील धक्कादायक घटना,VIDEO
Viral Video: चिमुकलीच्या डान्स व्हिडीओने 'मी हाय कोळी' गाण्यावर सोशल मीडियावर मचवली धूम, पाहा व्हायरल VIDEO

पोलिसांनी वाद सोडवण्याऐवजी विशाल गवळी यालाच पोलीस स्टेशनला आणले आणि त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून सोशल मीडियावर पोलिसांच्या या एकतर्फी भूमिकेमुळे संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात मराठी बोला, असे सांगणे हा गुन्हा आहे काय, असा सवालही विचारला जात आहे.

मुंब्य्रातील फळविक्रेत्याला मराठीतून बोलण्याचा आग्रह धरणारा विशाल गवळी याची आई कमला गवळी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, माझा मुलगा सध्या आजारी आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो अधूनमधून चिडचिड करतो. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करू नये, अशी मागणीही आईने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com