Kalyan Case: विशाल गवळी नेमका कुणाचा कार्यकर्ता? महेश गायकवाड यांचा भाजपला थेट सवाल

Mahesh Gaikwad on Vishal Gavali: नराधम विशाल गवळी नेमका कुणाचा कार्यकर्ता? महेश गायकवाड आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोप. यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी प्रत्युत्तर दिलं प्रत्युत्तर.
Mahesh Gaikwad
Mahesh GaikwadSaam Tv
Published On

कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला अटक करण्यात आलंय. अटक केल्यानंतर विशाल गवळी हा नेमका कुणाचा कार्यकर्ता आहे? या प्रश्नावरून महेश गायकवाड आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महेश गायकवाड यांनी विशाल गवळी याच्यावर अनेक आरोप केले आहेत.

महेश गायकवाड यांनी विशाल गवळी आणि त्याचे कुटुंब भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केलाय. पोलिसांवर राजकीय दबाव आहे ,भाजप पदाधिकारी गप्प का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. तर महेश गायकवाड यांनी विशाल गवळी याचे कुटुंब भाजपाचा प्रचार करतात. त्या संदर्भातले व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियात शेअर केले आहेत.

Mahesh Gaikwad
Kalyan Taloja Metro: कल्याण-तळोजा फक्त ४५ मिनिटांत, मेट्रोमुळे प्रवास होणार सुकर, कोण कोणती स्थानकं होणार?

तर यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी प्रत्युत्तर दिलंय. कल्याण पूर्वेत घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. पोलीस आपलं काम उत्तम प्रकारे करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरोपीला तीन महिन्यात फाशी होईल असं आश्वासन दिलंय. त्यामुळे कुणीही यात राजकारण आणू नये असा टोला महेश गायकवाड यांना नरेंद्र सूर्यवंशी यांनी लगावला.

Mahesh Gaikwad
Kalyan Travel Place: कल्याण स्टेशनपासून जवळ आहेत बेस्ट ठिकाणे, तुम्ही कधी गेलात का?

कल्याण पूर्वेतील १३ वर्षीय हत्या प्रकरणाचा खटला वकील उज्जवल निकम लढणार आहे. तर ३० दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आलं आहे. तसंच दोषींवर ४ महिन्यात कठोर कारवाई करण्यात येईल असा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, तर भाजपने देखील या आरोपाचे खंडन करतानाच विशाल गवळी याने महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ केलेले पोस्ट दाखवत आता हा कार्यकर्ता कोणाचा हा तुम्हीच विचार करा, असा सवाल केला. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे .पोलिसांचे काम उत्तम प्रकारे करताहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील या आरोपीला तीन महिन्यात फाशी होईल, असं आश्वासन दिलंय. त्यामुळे कोणी यात राजकारण आणू नये, असा टोला महेश गायकवाड यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com