

विरार-चर्चगेट लोकलचा मार्ग एका तरुणाने रेल्वे रुळांवर उभे राहून अडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विरारहून चर्चगेटकडे जाणारी लोकल एका माथेफिरू तरुणामुळे काही काळासाठी थांबवावी लागल्याची धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आलीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नायगाव आणि वसई रोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित तरुण रेल्वे रुळांवर उभा राहून लोकलचा मार्ग अडवत असल्याचं दिसत असून त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. यामुळे प्रवाशांचे मात्र काही काळ हाल झाल्याचं पाहायला मिळालं.
हा संपूर्ण प्रकार जवळच उपस्थित असलेल्या एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून, त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील संभाषण आणि आवाजाच्या आधारे ही घटना वसई परिसरातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, या घटनेबाबत पश्चिम रेल्वे किंवा रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अथवा दुजोरा देण्यात आलेला नाही.
दरम्यान रेल्वेतील एका धाडसी प्रवाशाने प्रसंगावधान राखत खाली उतरून संबंधित तरुणाला रुळांवरून सुरक्षित बाजूला केलं. त्यानंतर लोकलचा मार्ग मोकळा झाला आणि रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रुळांवर अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होतोय. व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि घटनेचा नेमका तपशील रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.