Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Kalyan Court latest news : कल्याण सत्र न्यायालयाने ९ वर्षीय सख्ख्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१२ मधील या प्रकरणाचा तब्बल १४ वर्षांनंतर निकाल लागला आहे.
Kalyan Court latest news
Kalyan Court latest newsसाम टीव्ही AI
Published On

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज/कल्याण

Kalyan court life sentence in child sexual abuse case : नऊ वर्षांच्या सख्ख्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला कल्याण सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कडक शिक्षा सुनावली आहे. तब्बल १४ वर्षे चाललेल्या या खटल्याचा अखेर निकाल लागला असून, नराधमाला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.

कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१२ मध्ये हा अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार घडला होता. नराधम बापाने स्वतःच्याच ९ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला होता. एका स्थानिक नागरिकाने हा प्रकार पाहिल्यानंतर तात्काळ कोळशेवाडी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या.

Kalyan Court latest news
मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी आर. पी. देशमुख यांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास केला. त्यांनी गोळा केलेले ठोस पुरावे आणि मजबूत तपासाच्या जोरावर तब्बल १४ वर्षांनंतर न्यायालयात हा गुन्हा सिद्ध झाला. कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लक्ष्मीकांत बिडकर यांनी या प्रकरणातील गांभीर्य विचारात घेऊन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Kalyan Court latest news
Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

घटनेनंतर अटक केल्यापासून हा आरोपी कारागृहातच होता आणि आता न्यायालयाच्या निकालानंतर त्याची रवानगी उर्वरित आयुष्यासाठी तुरुंगात झाली आहे. या संपूर्ण खटल्याच्या यशस्वी सुनावणीबाबत आणि ठोस तपासाबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी अधिकृत माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com