मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

Vaishalitai Nagwade, NCP Women's President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशालीताई नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संघटना बळकट करण्यासाठी पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Vaishalitai Nagwade Appointed as NCP Women's State President
Vaishalitai Nagwade Appointed as NCP Women's State President
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Vaishalitai Nagwade Appointed as NCP Women's State President : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या गच्छंतीनंतर रिकाम्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर वैशाली नागवडे यांची वर्णी लागली आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या म्हणून वैशाली नागवडे यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत नवे वळण आले आहे.

Vaishalitai Nagwade Appointed as NCP Women's State President
Vaishalitai Nagwade Appointed as NCP Women's State President

अजित पवारांच्या विश्वासू अन् तळागाळातील नेतृत्व

मुळच्या दौंडच्या असलेल्या वैशाली नागवडे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची दखल घेत अजित पवारांनी यापूर्वी त्यांच्यावर 'महानंदा दूध'च्या अध्यक्षपदाचीही महत्त्वाची धुरा सोपवली होती.

Vaishalitai Nagwade Appointed as NCP Women's State President
सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

चाकणकरांशी वाद आणि पक्षातील स्थान

पक्षात रुपाली चाकणकर यांच्याविरोधात अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेत राहिल्या होत्या. आता थेट चाकणकर यांच्या जागीच नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे नेतृत्व अधिक आक्रमक आणि बळकट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Vaishalitai Nagwade Appointed as NCP Women's State President
इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

दरम्यान, वैशालीताई नागवडे यांच्या नियुक्तीचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com