Maharashtra weather update today april 18
Maharashtra weather update today april 18Saam Tv News

Today Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या! आज सूर्यदेव आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट

Weather Update News : सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील २४ तासात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं असणार आहे.
Published on

मुंबई : राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून विदर्भातील अकोला येथे काल गुरुवारी उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात देखील उन्हाचा चटका वाढला असून सोलापुरात सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तापामान नोंदवलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा पारा पुन्हा चढणार आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात तापमान चाळीशी पारच राहणार आहे. साताऱ्यात काल गुरुवारी ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासात कमाल तापमान ४१ अंश तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यातील तापमान ४१ अंशावर गेलं असून हवामान विभागानं नागरिकांना दक्षतेचे आवाहन केलं आहे. मागील २४ तासांमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासात कमाल तापमान ४० तर किमान २० अंश सेल्सिअस राहील.

सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील २४ तासात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. आकाश निरभ्र राहणार असून वाढत्या उष्णतेमुळे पिकांची काळजी घेण्याचं देखील आवाहन केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात अंशतः घट दिसून येते. कमाल तापमान ३८ अंश तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं राहील. मागील २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात ३९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.


Maharashtra weather update today april 18
Ranjit Kasle : रणजित कासलेंना १० लाख, तर इतर अधिकाऱ्यांना किती कोटी? शरद पवार गटाच्या नेत्याचा सवाल

सोलापूर जिल्ह्यात पारा सतत वाढतच असून कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. वाढत्या उष्णतेने फळबागांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना पिकांची दक्षता घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे.


Maharashtra weather update today april 18
Bhiwandi: मौलवीला मुलाशी संबंध ठेवताना पाहिलं, १७ वर्षीय मुलाचा गळा दाबून हत्या अन् मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरलं; भिवंडी हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com