मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

maharashtra jobs : राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या करारामुळे हजारो तरुणांच्या नोकरीचा प्रश्न मिटणार आहे.
Maharashtra investment
maharashtra jobsSaam tv
Published On
Summary

महाराष्ट्रात १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; ८,००० जणांना मिळणार रोजगार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग

एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार

राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या गुंतवणुकीमुळे औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि 'एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड' समवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला.

मुख्यमंत्री समिती कक्षात करार झाला. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एएम इंटेलिजन्स लॅब्जचे अध्यक्ष अनिल चलमलाशेट्टी, संचालक मौर्य पायदा, उपाध्यक्ष पंकज कुमार अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे. तब्बल ८ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत .

Maharashtra investment
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

नव्या करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात (MMR) 'इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क' आणि 'एआय कॉम्प्युट हब' उभारला जाणार असून कंपनी थेट १,१४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सदर प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षणही होईल. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा तरुणांना रोजगार मिळेल. यात सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीमचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे २ हजार अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

महाराष्ट्रातील हा प्रकल्प ५०० मेगावॅट क्षमतेचा आहे. यात २,५०,००० उच्च क्षमतेचे 'एआय चिपसेट्स' वापरले जाणार आहेत. या प्रकल्पाचा दोन टप्प्यांत विकास केला जाईल. २०० मेगावॅट क्षमतेचा पहिला टप्पा २०२८ पर्यंत पूर्ण होईल. तर ३०० मेगावॅट क्षमतेचा दुसरा टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

Maharashtra investment
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात वाढ, पगार किती वाढणार?

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरण २०२३, हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क धोरण २०२४ अंतर्गत सदर प्रकल्प विकसित केला जाईल. राज्यााला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com