

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ
महागाई भत्ता पोहोचला ६० टक्क्यांवर
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने १ जानेवारी २०२६ पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात २ टक्क्यांची वाढ केली. त्यानंतर आता राज्य सरकारनेही महगाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता ५८ टक्क्यांहून ६० टक्के झाला आहे.
राज्य सरकारने महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लाभ मिळणार आहे. लाखा शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. याआधी शासकीय कर्मचाऱ्यांना ५८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. त्यात आता २ टक्क्यांची भर पडली आहे. त्यामुळे महागाई भत्ता ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.
ही वाढीव महागाई भत्त्याची वाढ कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतन श्रेणीनुसार होईल. कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती,त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने महागाईचा भत्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
शासनाच्या जीआरमध्ये काय म्हटलंय?
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक १ जानेवारीपासून लागू करण्यात आलेला २ टक्के वाढीव दराने महागाई भत्ता आणि ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहणार आहेत. त्यामुळे दि.०१/०१/२०२६ पासून ६० % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.
महागाई भत्त्यात किती टक्के वाढला? - २ टक्के
सरकारी कर्मचाऱ्यांना आधी महागाई भत्ता किती मिळत होता? ५८ टक्के
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.