DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैमध्ये महागाई भत्ता वाढण्याची शक्यता;पगारात होणार इतकी वाढ

Salary Hike Update: जुलै २०२६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ ते ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पगारात मोठी वाढ होऊन कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
8th Pay Commission Salary Hike Update
DA Hike Updategoogle
Published On

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्याच्या महागाई भत्त्याचा कल पाहता, येत्या जुलै २०२६ पासून महागाई भत्त्यात (DA) आणखी २ ते ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईचा विचार करून ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते.

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) च्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ मध्ये निर्देशांक १४८.९ वरुन १४८ पर्यंत वाढला. तर या आधी १८ एप्रिल २०२६ रोजी केंद्र सरकारने जानेवारी चक्रासाठी डीएमध्ये २ टक्क्यांची वाढ जाहीर केली होती. याच पार्श्वभुमीवर महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

आता जुलै २०२६ चक्रात हा महागाई भत्ता ६३ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये सरकार याबाबत अधिकृत घोषणा करू शकतं. तर यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात थेट वाढ होईल. म्हणजे लेव्हल १ मधील १८,००० बेसिक सॅलेरी असलेल्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६मध्ये २ टक्के वाढीनंतर दरमहा ३६० रुपये जास्त मिळतील. यात जर वाढ झाली तर हा आकडा ५४० पर्यंत पोहोचेल. म्हणजेच जानेवारीपासून एकूण ९०० रुपयांपर्यंत मासिक वाढ होऊ शकते.

कर्मचारी संघटनांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजीत सिंग पटेल यांनी वार्षिक वेतनवाढीचा दर सध्याच्या ६ ते ७ टक्क्यांनी वाढण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नात किमान १० टक्के वाढ व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच बँकिंग क्षेत्रावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा महिन्यांऐवजी दर ३ महिन्यांनी सुधारणा करण्याची मागणीही जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com