

संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात जुंपली
संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं नरेश म्हस्के यांचा दावा
नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केले गंभीर आरोप
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात नरेश म्हस्के यांनी पत्र लिहिल्याचा दावा
ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. उद्धव ठाकरेंना विरोध करणारे संजय राऊतच होते असा गंभीर आरोप शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केला आहे. तर एकनाथ शिंदेंविरोधात बोलणारे नरेश म्हस्केच होते असा पलटवार संजय राऊतांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना चँलेंज केले आहे. यावेळी संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असा खळबळजनक दावा नरेश म्हस्के यांनी केला.
नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असा दावा करत सांगितले की, 'संजय राऊत हे फेकूचंद आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले आणि स्वत:च्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाही त्यावेळी शिवसेनेतल्या आमदाराला पवईच्या हॉटेलमध्ये मिटिंग घ्यायला लावली. उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घ्या असे राऊतांनी सांगितले होते.'
नरेश म्हस्के यांनी यावेळी संजय राऊत यांना आव्हान केले. त्यांनी सांगितले की, 'तुम्ही तर राजीनामा द्या नाहीतर मी तरी राजीनामा देतो. कसल्या गप्पा मारत आहेत. वरिष्ठ नेते म्हणून तुमची आम्ही रिस्पेक्ट करतो. आमची मूठ बंद आहे तर बंद राहू द्या. एकनाथ शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली त्या दोन दिवस तुम्ही मला किती फोन करत होतात. रोज सकाळ- संध्याकाळ तुम्ही फोन करून मला काय बोलत होता हे तुम्ही जाहीर करा. मी नाही जाहीर करत, मी नव्हतो तुम्हाला फोन करत होतो आणि काय काय बोलत होता ते मला जाहीर करायला लावू नका.'
'नरेश म्हस्केंवर तुम्ही कितीही टीका करा. पण नरेश म्हस्केंनी भूमिका घेतली आहे आणि ते कायम त्यांच्यासोबत राहणार आहे हे लक्षात ठेवा. नरेश म्हस्के खुली किताब आहे. आम्ही त्यांच्यासारखे घोटाळे करणारे नाही आहोत. संजय राऊत खूप खोट्या गप्पा मारतात.' एकनाथ शिंदेंविरोधात म्हस्केंनी पत्र लिहिले होते असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, त्यांनी एक पत्र तरी दाखवावे जे पत्र मी लिहिले आहे. ते जर माझे पत्र असेल तर मी राजीनामा देईल आणि त्यांनी जर ते सिद्ध करून दाखवले नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.