Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेला मोठं खिंडार, शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Shinde Sena Faces Setback: कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेला मोठा धक्का बसला. शिंदेसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On
  • शिंदेसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • कल्याण -डोंबिवलीत भाजपची ताकद वाढली

  • भाजपने शिंदेंना मोठा धक्का दिला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण - डोंबिवलीच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. ठाकुर्ली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या कार्यकर्त्यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

ठाकुर्ली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपला बळकटी दिली. ठाकुर्लीच्या नगरसेविका शारदा प्रदीप चौधरी आणि भाजपच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात सध्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये कार्यकर्त्यांच्या पक्षांतराचे सत्र सुरू असून त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी, आमची चाल कासवाची आहे, पण आम्ही एकास चार घेऊ, असे सांगितले. युतीधर्माबाबत विचारले असता त्यांनी, आम्ही आमचा धर्म पाळला आहे. सुरुवात त्यांनी केली असून ज्यांचा भाजपवर विश्वास आहे ते स्वेच्छेने पक्षात प्रवेश करत आहेत,असेही स्पष्ट केले.

बंगाली समाज, बंजारा समाज तसेच विविध समाजघटकांतील तळागाळातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने पक्षाची ताकद वाढत असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. या प्रवेशामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या पक्षप्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद आणखी वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com