Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

Sanjay Raut and Naresh Mhaske viral video outside Supreme Court: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर आमने-सामने आले. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये खडाजंगी झाली याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत
Shivsena Shinde Group And Thackeray GroupSaam Tv
Published On
  • सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना आमने-सामने

  • शिवसेनेच्या नेत्यांचा सुप्रीम कोर्टाबाहेर ड्रामा

  • नरेश म्हस्के, संजय राऊत आणि अनिल देसाई यांचा व्हिडीओ व्हायरल

  • शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आजही सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावरून सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहेत. मंगळवारी देखील महत्वाची सुनावणी पार पडली. ही सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेमधील ड्राम्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज देखील सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आपली बाजू मांडत आहेत. मंगळवारच्या सुमावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, लोकप्रतिनिधी कायदा आणि पक्षाच्या घटनेवरून निवडणू आयोगाच्या अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली.

आजच्या सुनावणीत देखील दोन्ही शिवसेना आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार ड्रामा पाहायला मिळाला. शिंदेसेनेचे नेते नरेश म्हस्के आणि ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधला.

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत
CJP Protest: २० जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली, संजय राऊत कडाडले

नरेश म्हस्के आणि संजय राऊत हे दोन्ही नेते कोर्टाबाहेर एकमेकांना हसत हसत टोला लगावताना दिसले. संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर ठाकरेसेनेचे नेते अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांच्या दिशेने धावत गेले. तिन्ही नेते हसताना दिसले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याममुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तिन्ही नेत्यात काय बोलणं झालं याची माहिती समोर आली नाही. पण आज सकाळी नरेश म्हस्के यांनी या ड्राम्यावर प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com