विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपावरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षांकडून करण्यात आला. भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरीकरत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आले. गोपाळ शेट्टी यांनी निवणुकीतून माघार घेतली. त्यांनी माघारी घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, 'होय मी माघार घेतोय. मी आमदार बनण्यासाठी लढत नाही आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील ऑफर होत्या. मात्र मला तसं करायचं नव्हतं. मी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती. गोपाळ शेट्टी करतोय तर करु दे काय फरक करतो असं आमच्या पक्षात नाही. सर्व पक्षश्रेष्ठी मला भेटायला आलेत. माझं मत श्रेष्ठींबरोबर पोहोचले आणि झालंय. बाहेरचा उमेदवार आणू नये असं मी मूळीच म्हणत नाही आहे. मात्र सातत्याने झाल्याने मला हे करावं लागलं.'
तसंच,'पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा असतो. पक्षाकडे आपल्या भावना मांडल्या आहेत. पक्षाला समजायला वेळ लागणार नाही असं नाही. लोकांना काय वाटेल मला माहिती नाही. पक्षाच्या नेत्यांवर नाराज नाही पण काही नेते आहेत ते असं करत असतात. नकळत होत असेल पण त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे. प्रत्येकवेळी निर्णय घेणारा माणूस एकच नसतो. मी अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतो जे पक्षश्रेष्ठींचं ऐकतात. मी पक्ष नेतृत्वाचं ऐकतो तर ते देखील ऐकतील.', असे मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, बोरीवली विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गोपाळ शेट्टी हे देखील इच्छुक होते. पण उमेदवारी अर्ज न दिल्यामुळे गोपाळ शेट्टी हे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याची चर्चा होती. गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अनेक नेते मंडळींनी त्यांनी भेट घेत समजूत देखील काढली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.