Maharashtra Election : बंड थंड झालं? गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेणार, देवेद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी

Maharashtra Vidhan Sabha Election : गोपाळ शेट्टी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याकडून तसे संकेत देण्यात आले.
Maharashtra Politics
Devendra Fadnavis On Gopal ShettySaam Tv
Published On

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. जागावाटप झाल्यानंतर मविआ आणि महायुतीमध्ये नाराजी होती, उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली होती. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तीन तारखेपर्यंत गोपाळ शेट्टी उमेदवारी मागे न घेण्यावर ठाम होते. पण रविवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांच्यासोबत चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोपाळ शेट्टी अर्ज मागे घेणार असल्याचे संकेत मिळालेत. (Devendra Fadnavis Gopal Shetty)

गोपाळ शेट्टी यांचं बंड शमवण्यात भाजपला यश आलेय. गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गोपाळ शेट्टी यांचे बंड शमवण्यासाठी भाजपमधून जोरदार प्रयत्न करण्यात आले. रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गोपाळ शेट्टी यांच्यासोबत चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाल्याचे समोर आलेय.

गोपाळ शेट्टी सोमवारी उमदेवारी अर्ज मागे घेतील, अशी माहिती भाजपच्या नेत्याने दिली. गोपाळ शेट्टी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

२००४ आणि २००९ विधानसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी बोरिवलीमधून निवडून आले होते. पण २०१४ मध्ये त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर विधानसभेला विनोद तावडे यांना या मतदारसंघातून उतरवण्यात आले. २०१९ मध्ये सुनील राणे यांना विधानसभा तर शेट्टी यांनी पुन्हा लोकसभा दिली. पण २०२४ मध्ये या मतदारंसघातून पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. आता विधानसभेलाही गोपाळ शेट्टी यांना भाजपने तिकीट दिले नाही. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करत अर्ज भरला हता. आता फडणवीस यांनी त्यांची समजूत काढल्याचे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com