गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : राज्यात माहीम विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासमोर दोन्ही शिवसेनेचं आव्हान आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. मात्र, या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ठाम असल्याचे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट करत प्रत्येक नेत्याला पक्ष वाढवणं गरजेचं असतं, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतला आहे, असे सरवणकर यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सदा सरवणकर म्हणाले, 'मी यापूर्वी देखील म्हटलं आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मला एबी फॉर्म देण्यात आला. त्यांना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला. मी गेली १५ वर्षे काम करतोय. या मतदारसंघातून उमेदवारी न भरल्यास येथील कार्यकर्त्यांचं काय करायचं? शाखांचं काय करायचं. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक लढवणे गरजेचे आहे. मी राज ठाकरे यांचा आदर करतो'.
'प्रत्येक नेत्याला पक्ष वाढवणं गरजेचं असतं. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतला आहे. 4 लाख लोकांना आपल्यातील उमेदवार हवा आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करणे माझं काम आहे. आम्हाला महायुतीचा निवडून द्यावा लागेल, असं देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या विषयावर जवळजवळ पडदा पडला आहे. मी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहे. मला यश निश्चित येईल, असे सरवणकर पुढे म्हणाले.
'लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता लोकांना हवा आहे. जनतेला ३६५ दिवस काम करणारा नेता पाहिजे, असेही सरणकर पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.