मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन येण्यास थोडा जरी उशिर झाला तरी प्रवाशांची तुडूंब गर्दी पाहायला मिळते. अशात जर लोकल फेऱ्या रद्द झाल्या तर प्रवाशांचे भरपूर हाल होतात. प्रवासात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विविध कामांसाठी कालपासून पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या २७० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२७ ऑक्टोबरपासून ते ५ नोव्हेंबरपर्यंत काम सुरू असल्याने लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांच्या झालेल्या गौरसोयीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
सध्या सोशल मीडियावर बोरीवली रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. २७० लोकल फेऱ्या रद्द केल्याने नागरिकांना कोणतीही पर्यायी सुविधा नसल्याने रेल्वे स्थानकात काल मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी जास्त झाली की, मुंग्यांप्रमाणे चाकरमानी रेल्वे स्टेशनवर उभे राहिले होते.
ट्रेन स्थानकात आल्यावर ती पकडण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. यावेळी काही प्रमाणात चेंगराचेंगरी होतेय की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. या गर्दीमुळे यंत्रणांमधील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला. बोरीवली स्थानकातील कालची गर्दी इतकी जास्त होती की अन्य व्यक्तींना हे भीषण वास्तव पाहून काळजात धडकी भरल्यासारखे नक्की वाटेल. गर्दीतून वाट काढताना कुणाच्या चपला तुटल्या तर कुणाला हातापायाला दुखापत झाली.
मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आलेय. त्यामुळे २७० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. काल पहिल्याच दिवशी बोरीवली स्थानाकात इंडिकेटर बंद पडलं होतं. त्यामुळे प्रवाशांचे भरपूर हाल झाले. संतप्त प्रवाशांचा पार वाढल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.