मंगेश बांदेकर
गडचिरोली : गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेली बस यानंतर एका हातात स्टेरिंग व (Gadchiroli) एका हातात वायफर फिरवत असलेला बसचा व्हिडिओ राज्यभर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर याच आगाराचा (St Bus) आणखी एक धक्कादायक नवा व्हिडिओ समोर आला आहे. (Maharashtra News)
एकीकडे राजकीय मंडळी गडचिरोलीत विमानतळ उभारण्याच्या बाता करत असल्या तरी गडचिरोलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे चित्र गेल्या काही दिवसात पाहावयास मिळत आहे. (MSRTC) राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसचा मुद्दा यामुळे समोर येत आहे. पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बसमध्ये छत्री घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळ
भर पावसात हातात छत्री घेऊन एका हाताने स्टेअरिंग कंट्रोल करणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. अहेरी आगारात असे अनेक प्रकार घडत असतानाही राज्य सरकार मात्र या आगाराला नवीन बस पुरवण्यात दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.