
सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव इ अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांतील लोकांना बॅकवॉटर मधून (Nandurbar) जीवघेणा प्रवास करावा लागत होता. परंतु आता नर्मदा काठावरील आदिवासींचा हा जीवघेणा (Narmada River) प्रवास थांबणार आहे. बिलगाव पुलासाठी ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Tajya Batmya)
नंदूरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिक नर्मदा नदीच्या पलीकडे राहत असून या नागरिकांना जाण्यासाठी बिलगाव येथे जाण्यासाठी पूल तयार करण्यात येत होता. मात्र हा पूल गेल्या अनेक वर्षापासून अपुरे अवस्थेत होता. यामुळे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील १० ते १२ गावांना येण्या जाण्यासाठी सोय नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर जीव धोक्यात घालून नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून प्रवास करावा लागत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आता या पुलासाठी ४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या पुलाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे.
नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे धडगाव तालुक्यांतील बिलगाव ते सवाऱ्यादिगर परिसरातील दहा ते बारा गावांना आणि पंधरा ते वीस पाड्यांना जोडणारा उदयनदीवरील गेल्या दहा ते बारा वर्षांपासून हा पूल अपूर्ण आवस्थेत आसल्याने जवळपास सात हजार नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. मात्र आदिवासी विकास विभागाकडून या पुलाच्या कामात पूर्ण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना येणे जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. या पुलाला पूर्ण तयार हो यासाठी अनेकदा तक्रारी निवेदन आणि आंदोलन केले होते मात्र आता या निवेदन तक्रारीने आंदोलनाला यश आला असून लवकरच हा बोल आता तयार होणार आहे
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.