Malaria Fever: मलेरियामुळे पहिला बळी; भंडारा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क

Bhandara News मलेरियामुळे पहिला बळी; भंडारा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क
Malaria Fever
Malaria FeverSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचे आजार डोके वर काढत असतात. हि साथ झपाट्याने वाढत असते. असाच (Bhandara) भंडारा जिल्ह्यात मलेरियाची (Malaria) लागण झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तुमसर शहरातील सम्यक सोंनपिपरे यांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Malaria Fever
Chandrashekhar Bawankule: "चांद्रयान मोहिमेबद्दल आनंद साजरा होत असताना उद्धव ठाकरेंना पोटदुखी"; सामनाच्या अग्रलेखावर बावनकुळेंचं चोख प्रत्युत्तर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सम्यक याची प्रकृती खराब झाल्याने त्याला स्थानीक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला डेंग्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. तसे रक्त तपासणी सुध्दा करण्यात आली होती. पण त्याची प्रकृतीमध्ये सुधार होत नसल्याने त्याला नागपुर येथे हलविण्यात आले.  

Malaria Fever
Parali News: आजारी आईला तपासा म्हणत मुलाने डॉक्टरला फेकून मारली वीट

अहवालापूर्वी झाला मृत्यू 

यानंतर सम्यक यास नागपूर येथे नेले असता मृत्यू झाला आहे. तर त्याच्या रक्त तपासणी अहवाल आला असून मलेरियामुळे मृत्यू  झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सर्व नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावे जेणे करुन डास तयार होणारं नाही असे आव्हानं करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com