Maharashtra Election : राज्यातील आणखी ३ उमेदवार अचानक नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Election update : राज्यातील आणखी ३ उमेदवार अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. अचानक ३ उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 राज्यातील आणखी ३ उमेदवार अचानक नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra ElectionSaam tv
Published On

मुंबई : पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे प्रकाश निकम देखील नॉट रिचेबल झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील बोईसर, पालघर आणि आता विक्रमगड विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे देखील कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील २ उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत. राज्यातील आणखी ३ उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इच्छुक नाराज पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीला बंडाचे ग्रहण लागल्याचं बोललं जात आहे. बंडाळी शमविण्यासाठी आणि मोडीत काढण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत.

 राज्यातील आणखी ३ उमेदवार अचानक नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai Malad Assembly : असलम शेख यांनी उमेदवारी अर्जसोबत चुकीची माहिती दिली? भाजप उमेदवार घेणार न्यायालयात धाव

पालघरमधील दोन मतदारसंघातील बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल असताना आता विक्रमगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे देखील आता नॉट रिचेबल झाले आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

नाशिकमधील दोन उमेदवार नॉट रिचेबल

दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघातील शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले आणि देवळाली मतदारसंघातील राजश्री अहिरराव नॉट रिचेबल झाले आहेत.

दोघांनाही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विमानाने एबी फॉर्म पाठवले होते. मात्र आता या दोन्ही उमेदवारांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश आल्यानंतर दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 राज्यातील आणखी ३ उमेदवार अचानक नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra election : मोठी बातमी! मनोज जरांगेंनी लढायचं ठरवले, मतदारसंघही फायनल, वाचा कुठे उमेदवार उतरवणार?

वरिष्ठांनी दोन्ही उमेदवारांनाही माघार घेण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. मात्र दोन्ही उमेदवार नॉटरिचेबल झाल्याने शिंदे यांच्या शिवसेनेसह महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अजित पवारांच्या उमेदवारांसमोर उमेदवार दिले होते. या दोन्ही उमेदवारांच्या माघारीचा मुंबईतील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com