Mumbai Malad Assembly : असलम शेख यांनी उमेदवारी अर्जसोबत चुकीची माहिती दिली? भाजप उमेदवार घेणार न्यायालयात धाव

Mumbai Malad Assembly Election : विरोधी उमेदवारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवला आक्षेप; विनोद शेलार न्यायालयात जाणार
Mumbai Malad Assembly Election
Mumbai Malad AssemblySaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल स्क्रुटीनीच्या वेळेस काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार असलम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला. असलम शेख यांनी आपल्या अर्जात त्यांच्या शिक्षणासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप विरोधी उमेदवारांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार देखील केली आहे. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने ग्राह्य धरला आहे. मात्र या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे मालाड विधानसभेसाठीचे उमेदवार विनोद शेलार यांनी म्हटले आहे.

Mumbai Malad Assembly Election
Sheikh Hasina: मोठी बातमी! बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा?

मुंबईच्या मालाड विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे असलम शेख हे तीन वेळा आमदार राहिले आहेत 2009 पासून त्यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आमदारकीची प्रथम निवडणूक लढवताना असलम शेख यांनी आपले शिक्षण बारावीपर्यंत झाले असल्याचे आपल्या 2009 च्या निवडणुकीतील अर्जात म्हटले होते. तसे कागदपत्र देखील त्यांनी निवडणूक आयोगाला पुरविले होते. त्यानंतर झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत असलम शेख यांनी नवे उत्तीर्ण झाल्याबाबतची माहिती निवडणूक अर्जासोबत दिली होती. तसे कागदपत्र ही पुरविण्यात आले. मात्र आत्ता 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना असलम शेख यांनी आपले शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाल्याबाबतची माहिती पुरविली.

तर कागदपत्र ही निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. मात्र त्यांच्या याच अर्जातील तफावतीवर आता विरोधी अपक्ष उमेदवारांसोबतच भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार विनोद शेलार यांनी देखील निवडणूक अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवली आहे. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी असलम शेख यांचा अर्ध वैध ठरवला आहे. असे असले तरी या निर्णयाविरोधात अपक्ष उमेदवारांसोबतच भाजप महायुतीचे उमेदवार विनोद शेलार हे न्यायालयीन लढादेखील लढणार आहेत.

यासंदर्भात बोलताना विनोद शेलार म्हणाले असलम शेख कदाचित बारावी उत्तीर्ण असतील किंवा आठवी उत्तीर्ण असतील आता असलम शेख म्हणतात माझ्याकडे आठवी उत्तीर्ण असल्याचे कागदपत्र आहे तर ते कदाचित आठवीही उत्तीर्ण असतील मात्र. याचा अर्थ असा की असलम शेख अगोदर खोटे बोलले अगोदर संविधानाशी खोटे बोलले प्रशासनाशी खोटे बोलले.

त्यांचे करिअर 2009 पासून सुरू झालेले आहे. करिअरची सुरुवातच खोटे बोलून झालेली आहे खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. ते पालकमंत्री देखील झाले खोटे बोलूनच. अर्जांची पडताळणी सुरू असताना आम्ही हरकत घेतली. त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही अस्लम शेख यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे देखील सांगितलं आहे. मात्र त्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरविला जरी असला तरी आम्ही न्यायालयात हा लढा लढू. फक्त मीच नाही भारतीय जनता पक्ष देखील असलम शेख यांच्या विरोधातील हा लढा शेवटपर्यंत लढणार असल्याचे विनोद शेलार यांनी सांगितले.

असलम शेख यांची खोट्या आधारावर राजकीय इमारत उभी आहे. पालकमंत्री सुद्धा तुम्ही खोटे बोलून झालेला आहे आणि याचा निषेध करतो. विनोद शेलार यांच्याकडून हे प्रकरण न्यायालयात जाणार आहे मात्र यामुळे कदाचित असलम शेख यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

Mumbai Malad Assembly Election
Sheikh Hasina: टीव्ही, पंखेही सोडले नाही, आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातून काय काय लुटलं? पाहा PHOTO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com