Manoj Jarange Patil, Maharashtra Vidhan Sabha elections 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी काही मतदारसंघही निवडले आहेत. आपल्याला राजकारणाचा जास्त अनुभव नसल्यामुळे उमेदवार निवडण्यासाठी वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील अधिकृत माहिती देणार आहेत.
बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. केज मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार आहे. त्याशिवाय गेवराई आणि आष्टीबाबत चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांचा निर्णय काय?
बीड जिल्ह्यातू एक लढणार. बीड विधानसभा मतदारसंघ लढवणार. गेवराई आणि आष्टीबाबत नंतर चर्चा करून बघू
जिल्ह्यात काही पाडायचे आहेत. जिथं त्रास दिला आहे, त्याला पाडून बदला घ्यायचा आहे.
बीड - बीड विधानसभा मतदारसंघ लढवणार.
गेवराई आणि आष्टीबाबतनंतर चर्चा करून बघू. केज (राखीव) बाबत स्थानिक मराठा जे निर्णय घेतली तो निर्णय घेऊ.
जालना - परतूर लढवणार
आज अंतरवाली सराटीमध्ये सर्व मतदारसंघातील इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय एकत्रित चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात आलाय. ज्या मतदारसंघांमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित असे समीकरण जुळेल त्या मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आला. ज्या मतदारसंघांमध्ये समीकरण जुळणार नाहीत, उमेदवार असणार नाहीत, त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये जी भूमिका होती तीच भूमिका राहील असेही सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.