Maharashtra Politics: ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

CM Devendra Fadnavis On 500 Crore Audio Clip: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर पहिली प्रतिक्रिया दिला. त्यांनी या ऑडिओ क्लिपच्या तपासणीचे आदेश दिलेत.
Maharashtra Politics: ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
CM Devendra Fadnavis On 500 Crore Audio ClipSaam Tv
Published On: 
  • मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराची ऑडिओ क्लिप समोर आणली

  • मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही ऑडिओ क्लिप सर्वांना ऐकवून दाखवली होती. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. या ऑडिओ क्लिपची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल सांगितले की, 'अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यामागचे षडयंत्र काय? हे तपासले जाणार आहे. या ऑडिओ क्लिपचा पूर्णपणे तपास होईल. आम्हाला सर्वांना प्रश्न पडला आहे की अडीच वर्षांनंतर ही ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागचा हेतू काय आहे? कुणाला टार्गेट केले जात आहे? कशासाठी केले जात आहे? या संदर्भात पूर्ण चौकशी करून सत्य आम्ही बाहेर काढू.'

Maharashtra Politics: ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची तपासणी एसआयटी करणार आहे. यावरून संजय राऊत यांनी प्रकिक्रिया देत सरकारवर सडकून टीका केली. फडणवीसांनी एसआयटीचा खेळ चालवला आहे. एसआयटी काय असते? तुमचाच ढोल आणि तुमच्याच दांडिया. आतापर्यंत फडणवीसांनी ११२ एसआयटी स्थापन केल्या. आल्यापासून ते फक्त एसआयटी स्थापन करत आहेत. फडणवीसांकडून एसआयटीचा खेळ चालला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिंदेगट आणि अजित पवार गटाकडून पैशाचा खेळ कसा चालला आहे याचा स्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला.'

Maharashtra Politics: ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
Manoj Jarange: 'माझ्या नादी लागू नका, हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com