Manoj Jarange: 'माझ्या नादी लागू नका, हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Audio Bomb: मनोज जरांगे पाटील फडणवीस सरकारविरोधात चांगलेच संतप्त झाले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारविरोधात मोठा ऑडिओ बॉम्ब टाकला.
Manoj Jarange: 'माझ्या नादी लागू नका, हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
MANOJ JARANGE PATILsaam tv
Published On: 
  • मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली

  • मनोज जरांगे यांनी सरकारला इशार देत थेट ऑडिओ बॉम्ब टाकला

  • ५०० कोटींच्या आरोपावर मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आज मोठा ऑडिओ बॉम्ब टाकला. त्यांनी या पत्रकार परिषदेत थेट पुरावेच सादर केले. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. 'हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार. मी लय लांब हात टाकू शकतो. माझ्या नादी लागू नका.', अशा शब्दात जरांगे सरकारवर संतापले. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुरावे दाखवा असे आव्हान केले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट ऑडिओ बॉम्ब टाकला आणि सरकारविरोधातील अनेक पुरावे सादर केले.

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'माझ्या नादी लागू नका नाहीतर १ ते २ महिन्यात असं काही बाहेर काढेन की हादरून जाल. मी आता थांबणार नाही, मी खोलात जाणार आहे. मी ३ वर्षे सहन केलं. १०० वर्षात जे बाहेर नाही आलं ते मी बाहेर काढणार आणि सगळ्यांचा बाजार उठवणार. मराठ्यांनो मी थोडे दिवस कार्यक्रमांपासून लांब राहणार नाहीतर हे सरकार आपले कुणबी प्रमाणपत्र रद्द करतील. शिंदे तुमचे फोन कोणाला कोणाला जातात हे आम्हाला माहिती आहेत.'

Manoj Jarange: 'माझ्या नादी लागू नका, हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

तसंच, 'बीड सारख्या ठिकाणी १०० गुन्हे झाले ते कोण आहे हे मला माहिती आहे. शिंदे तुम्ही सावध व्हा. २०२९ ला मराठे तुमच्या बाजूने राहणार नाहीत. पत्रकारांना धमक्या देऊन अराजकता माजवत आहेत. आम्हाला माहिती आहे कोणता पत्रकार तुम्ही तुमच्या हाताखाली ठेवला आहे. मला बदनाम करणारे तुमचे लोक आहेत. तुम्ही हाताखाली धरलेल्या माणसांमुळे तुम्ही अडचणीत येणार आहेत फडणवीस. तुमचे आमदार- खासदार, मंत्री यांचे करिअर आता धोक्यात आहे.'

Manoj Jarange: 'माझ्या नादी लागू नका, हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Protest : मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, नेमके काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com