परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना.
आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली तपासाला गती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाला अधिक बळ.
नागरिकांत न्यायाची अपेक्षा आणि तपासाच्या पारदर्शकतेचा विश्वास.
परळीतील व्यवसायिक महादेव मुंडे हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक कार्यरत होणार आहे. बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आज हे पथक दाखल होण्याची शक्यता आहे.
परळीतील व्यावसायिक महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर रोजी भर चौकात हत्या करण्यात आली. मुंडे यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा कापल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महादेव मुंडेंच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे आणि भार्गव सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांची टीम या पथकाला तपासासाठी सहकार्य करणार आहेत.
पंकज कुमावत सध्या अमरावती ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यात विशेष पथकात काम करत असताना त्यांनी अनेक उल्लेखनीय कारवाया केल्या होत्या. २०१८ साली युपीएससीत यश मिळवून ते आयपीएस झाले. केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुटख्याचे साठे, पत्त्याचे क्लब आणि बायोडिझेलवरील छाप्यांमुळे खळबळ उडवली होती. त्यांच्या धडक कारवायांमुळे केजमधील माफिया राजाला तडे गेले आणि स्थानिक गुन्हेगारीला मोठा आळा बसला.
पंकज कुमावत यांच्या निष्पक्ष व धाडसी कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच या प्रकरणात सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांसह जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. एसआयटीच्या आगमनाने प्रकरणाचा तपास अधिक गतीमान आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरण काय आहे?
परळीतील व्यावसायिक महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर रोजी भर चौकात हत्या झाली होती. शवविच्छेदन अहवालात गळा कापल्याचे नमूद करण्यात आले.
या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी का स्थापन करण्यात आली?
तपासात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून एसआयटी गठीत करण्यात आली.
एसआयटीचे नेतृत्व कोण करत आहे?
अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी काम करत आहे.
स्थानिक नागरिकांची या तपासाबाबत काय अपेक्षा आहे?
नागरिकांना विश्वास आहे की, एसआयटीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.