कडक उन्हाचा फटका, पोहायला गेले, पुन्हा परतलेच नाही; २ जिवलग मित्रांसह ५ जणांचा मृत्यू

Maharashtra shocking : पोहायला गेले दोन जिवलग मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चंद्रपुरातही तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
maharashtra latest news
junnar shockingSaam tv
Published On
Summary

महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी ५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

५ जणांच्या मृत्यूच्या घटनेने गावात हळहळ

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. पुण्यासह जुन्नरच्या नागरिकांनाही उन्हाचा कडाका सहन करावा लागत आहे. याच कडक उन्हात थंडावा मिळवण्यासाठी पाण्यात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर चंद्रपुरातही तिघांचा बुडून झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नरमधील दोन जिवलग मित्र थंडावा मिळवण्यासाठी शेततळ्यात पोहायला गेले होते. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गावातील एका शेतातील तळ्यात घडली. दोघे जण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली.

maharashtra latest news
रील बनवणं पडलं महागात; ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

रेस्क्यू पथकाने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. पोहायला गेलेल्या दोन मित्रांच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले. या घटनेने दोघांच्या मैत्रीचा शेवटही वेदनादायी ठरलाय. उन्हाळ्यात पोहण्यासाठी शेततळे, विहिरी, तलावामध्ये जाताना मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीशिवाय जाऊ नये, खोल पाण्यात उतरणे टाळावे आणि पालकांनी सतत लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

maharashtra latest news
Shocking: नदीत बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू; पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत

पिता पुत्रीसह तिघांचा बुडून मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राजू कोडापे (वय 40), अर्पिता कोडापे (वय 12) पिता-पुत्री आणि प्रियांका मडावी (वय 14) या भाचीचा समावेश आहे. नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com