

रील बनवताना चार मित्रांचा नदीत बुडून मृत्यू
रील बनवण्यासाठी ५ मित्र नदीत उतरले, त्यापैकी एकच बचावला
स्थानि पोलिसांनी बचावकार्य करून ४ जणांचे मृतदेह बाहेर काढले
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून दु:खद घटना समोर आली आहे. राप्ती नदीच्या पात्राजवळ रील बनवणे ४ जणांचा चांगलं महागात पडलं आहे. या ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नदीत शुक्रवारी सकाळी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. रील बनवण्याच्या नदीकाठी गेलेल्या अवघ्या १३ ते १५ वयोगटातील मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रील बनवण्यासाठी ५ मित्र बुधवारी दुपारी ३.३० वाजता नदीकाठी गेले होते. अमन उर्फ बीरू (१५), विवेक निषाद (१५), गगन पासवान (१५), अनिकेत यादव (१३), राजकरण उर्फ टाइमपास असे पाच जण नदीच्या काठावर गेले होते.
पाचही मित्रांनी नदीत अंघोळीसाठी पाण्यात उतरले. या ५ जणांना पाण्यात रील तयार करायचं होतं. पाण्यात मस्ती करताना ५ जणांचा तोल गेला. त्यामुळे या ५ जण पाण्यात बुडाले. राजकरणने पोहत काठावर पोहोचला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. परंतु उर्वरित चारही जणांचा मृत्यू झाला.
राजकरणने काठावर पोहोचल्यानंतर तातडीने नातेवाईक आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून चौघांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू केलं. त्यांनी बुधवारी रात्रीपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले. परंतु त्यांना चौघेही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी १०० मीटर लांब विवेकचा मृतदेह हाती लागला. तर शुक्रवारी सकाळी राप्ती नदीत तरंगताना तिघांचे मृतदेह आढळले. पोलिसांना माहिती मिळताच तिघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. एकाच गावातील ४ जणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.