रविवार ठरला अपघात वार! महामार्गावर रात्री अपघाताचा थरार; ६ जणांचा मृत्यू

bihar political news : बिहारमध्ये महामार्गावर रात्री अपघाताची घटना घडली. वेगवेगळ्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला.
accident
accident representative image
Published On
Summary

वेगवेगळ्या अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू

अररिया, किशनगंज आणि कटिहार भागात अपघाताच्या घटना

दुचाकी अपघातांमध्ये तरुणांचा बळी

बिहारमध्ये मध्यरात्री घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये तरुणांचा समावेश आहे. बिहारच्या अरिरिया, किशनगंज आणि कटहल डांगीमध्ये ही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ६ जणांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील नरपतगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ५७ जवळ पलासीजवळ भीषण अपघात झाला. रस्ते अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाला. पलासीजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना रुग्णालयात करत तपासाला सुरुवात केली होती. या अपघातावर वरिष्ठ पोलीस अधिकारी मुकेश कुमार शाह यांनी सांगितलं की, 'मृतांची ओळख पटली आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला जात आहे. तिघेही तरुण सुपौल जिल्ह्याचे रहिवासी होते. मो. अरबाज, समीर, अशरफ अशी तिघांचे नावे आहेत. तिघेही जण दुचाकीने जोगबनी येथे जात होते.

accident
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हिट अँड रन; अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

किशनगंज जिल्ह्याच्या पौआखाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी सांयकाळी रस्ते अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या तरुणांचा अपघात रविवारी रात्री ८ वाजता घडला. तिघेही युवक दुचाकीने जियापोखर येथे चालले होते. जियापोखर येथे जाताना अपघात घडला.

accident
गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई-पुणे हायवेवर अपघाताचा थरार; IIT मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

तत्पूर्वी, ठाकूरगंजच्या कटहल डांगीजवळील आदरागुरी गावात दुचाकी आणि पिकअप गाडीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तर दोन तरुण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांनी तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी एका तरुणाला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com